जगाच्या पाठीवर श्वानप्रेमींची काही कमी नाही. आजही अनेक घरांमध्ये श्वानाला (dog) कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे वागवलं जातं. त्यामुळे मग एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याच संगोपन केलं जातं. त्यातच हे श्वानदेखील अगदी लहान बाळ असल्यासारखं स्वत:चे लाड पुरवून घेत असतात. विशेष म्हणजे अनेक घरांमध्ये श्वानांसोबत संवाद साधला जातो आणि हे श्वानदेखील त्या संवादाला प्रतिसाद देत असतात. त्यामुळे या श्वानांना आपली मानवी भाषा समजते की काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु, हे सत्य आहे. खरंच श्वानांना जन्माला आल्यापासून मानवी भाषा समजू लागते. अलिकडेच याविषयी एक रिसर्च करण्यात आला असून त्यात श्वानांना मानवी भाषा समजत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (puppies-are-born-ready-to-interact-with-people-study-finds)

कुत्र्याचं पिल्लू जन्माला आल्यापासून ते मानवाशी संवाद साधण्यासाठी तयार असतं. मानव कोणती भाषा बोलतोय हे त्यांना पटकन समजत आणि त्यानुसार, ते प्रतिक्रिया देत असतात. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ एरोजॉना स्कूल ऑफ अथ्रोपोलोजीमध्ये एक रिसर्च करण्यात आला आहे.

Also Read: पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी तरुणीने घेतला अस्वलासोबत पंगा

एरिजॉना कॅनाइन कॉग्निशम सेंटरमधील एमिली ब्रे यांनी याविषयी रिसर्च केला असून त्यांनी श्वानांच्या आकलनशक्तीविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘प्रथम कुत्र्याचं पिल्लू समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करतात. त्यानंतर समोरील व्यक्तीने इशारा केला तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देतात’, असं ब्रे यांनी सांगितलं. ब्रे गेल्या १० वर्षांपासून गाईड डॉग डेव्हलपमेंटविषयी अभ्यास करत आहेत. ब्रे यांनी केलेला रिसर्च ‘करेंट बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

“कुत्र्याचं पिल्लू जन्माला आल्यापासून प्रचंड सतर्क असतं. समोरचा व्यक्ती कोणती हालचाल करतोय याचं तो नीट निरीक्षण करत असतो. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे कोणतीही गोष्ट शिकवण्याची गरज भासत नाही”, असं ब्रे म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “एखाद्या व्यक्तीने केलेला हाताचा इशारा किंवा नजरेने केलेला इशारा कुत्र्याच्या पिल्लाला लगेच समजतो.” दरम्यान, ब्रे व त्यांच्या टीमने जवळपास ३८५ कुत्र्यांच्या पिल्लांचा अभ्यास केला. यावेळी त्यांनी मालक व श्वानांच्या पिल्लांना काही टास्क दिले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here