सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्याची गडबड सुरु असतांनाच अचानक सिलेंडर संपला तर ऐनवेळी धावपळ सुरु होते. परिणामी, या गडबड गोंधळात चिडचिडदेखील होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच त्रासदायक झाली की संपूर्ण दिवस खराब जातो. म्हणूनच, कायम घरातील कोणती गोष्ट कधी संपणार आहे याकडे वेळोवेळी लक्ष द्यावं लागतं. परंतु, सिलेंडर ही अशी गोष्ट आहे जी कधी संपणार यांचा अचूक अंदाज लावता येत नाही. परंतु, अशा काही ट्रीक्स आहेत ज्यामुळे सिलेंडर कधी संपणार आहे याचा अंदाज आपल्याला आधीच लावता येतो. (your-gas-cylinder-is-going-to-be-empty-follow-this-easy-trick-to-find-out)
अनेक जण सिलेंडर हलवून त्यात किती गॅस आहे याचा अंदाज घेत असतात. त्यातून त्यांना सिलेंडर किती दिवसात संपेल हे समजतं. परंतु, प्रत्येकालाच ही गोष्ट जमेल असं नाही. त्यामुळे अशी एक सोपी ट्रीक पाहुयात ज्यामुळे सिलेंडर संपण्यापूर्वीच आपल्याला समजेल आणि आपण नवीन सिलेंडरसाठी बुकिंग करुन ठेऊ शकतो.
Also Read: जन्मताच श्वानांना समजते मानवी भाषा; अभ्यासात आलं समोर

ही आहे भन्नाट ट्रीक
१. सर्वात प्रथम एक भिजवलेलं कापड घ्या.
२. भिजवलेल्या कापडाने सिलेंडर पुसून घ्या आणि १० मिनिटे ते पाणी वाळण्याची वाट पाहा. ( यावेळी फॅन चालू ठेऊ नका)
३. ज्या भागातील गॅस संपला असेल त्या भागातील पाणी लवकर वाळेल. व ज्या भागात गॅस भरलेला असेल तेथील पाणी वाळायला वेळ लागेल.
Also Read: गाय-वासराला पाणीपुरीची भुरळ; पाहा भन्नाट व्हिडीओ
४. सिलेंडरमध्ये गॅस असतांना सिलेंडर थंड असतो. पण जसजसा त्यातील गॅस संपू लागतो त्यावेळी त्याचं तापमान गरम होतं. त्यामुळे सिलेंडरवर पाणी फिरवल्यास तो भाग लवकर वाळतो.
दरम्यान, अनेकदा गॅस संपत आल्यावर त्याच्या फ्लेमचा रंग बदलतो. यावरुनही अंदाज लावता येतो. गॅस संपत आल्यावर त्याची फ्लेम जांभळट, लालसर रंगाची दिसू लागते.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही प्रयोग करण्यापूर्वी स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.)
Esakal