कोणत्याही मंदिरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये गेल्यावर आपल्याला तिथे पुजारी किंवा धर्मगुरू पाहायला मिळतात. देवाची पूजाआर्चा करण्यासोबतच हे धर्मगुरु भक्तांच्या शंकांचं निरसनदेखील करत असतात. परंतु, मंदिरात पुजारींऐवजी रोबोट सगळ्या धार्मिक विधी करत असल्याचं पाहिलं आहे का? सहाजिकच नाही. विज्ञान कितीही पुढे गेलं तरीदेखील मंदिरात कायम पुजारी वा धर्मगुरुच पाहायला मिळतात. मात्र, जपानमध्ये असं एक प्राचीन मंदिर आहे जेथे चक्क रोबोट देवांची पूजा करतो. सध्या सोशल मीडियावर या मंदिराची व रोबोट पुजाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (not-the-priest-but-robot-does-the-worship-in-400-year-old-buddhist-temple-in-japan)
जपानमध्ये एक ४०० वर्ष जुनं प्राचीन मंदिर असून त्यात एकही पुजारी नाही. त्याऐवजी येथे रोबोटमार्फत धार्मिक विधी केले जातात. तसंच या मंदिरात अशा अनेक परंपरा आहेत ज्या विचित्र असल्याचं म्हटलं जातं.

जपानमध्ये असलेल्या या प्राचीन बौद्ध मंदिरात काम करत असलेल्या रोबोटचं नाव अँड्रॉयड कॅनन आहे. हा रोबोट जपानच्या क्योटो येथे असलेल्या कोदाइजी मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. विशेष म्हणजे अँड्रॉयड केवळ देवांची पूजाच करत नाही. तर, सोबत आलेल्या भाविकांना धार्मिक ज्ञानदेखील देतो आणि त्यांच्या शंकांचं निरसनही करतो.
हा रोबोट पुजारी कधीही मरण पावणार नाही आणि बदलत्या काळाप्रमाणे तो स्वत: ला विकसित करतो. विशेष म्हणजे हा रोबोट बदलत्या बौद्ध धर्माप्रमाणे त्याच्या ज्ञानात भर घालत आहे. त्यामुळे भाविकांनी विचारलेल्या प्रश्नांना तो योग्य उत्तर देतो, असं या मंदिरातील टेन्शो गोटो या पुजाऱ्याने सांगितलं.

Also Read: टेन्शन नॉट! सिलेंडर संपला की आहे? या टिप्सने ओळखा
कसा दिसतो हा रोबोट पुजारी
अँड्रॉयड हा हुबेहूब मानवाप्रमाणे दिसतो. सहा फूट उंच असलेल्या अँड्रॉयड सिलिकॉनपासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा चेहरा व हात, खांदे अगदी मानवाप्रमाणे भासतात. अँड्रॉयडला तयार करण्यासाठी १० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. ओसाको विद्यापीठातील नावाजलेले रोबोटिक्स प्रोफेसर आणि जैन मंदिरातील काही विश्वस्तांच्या मदतीने तयार करण्यात आलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये पुरूष पुजारी किंवा धर्मगुरू म्हण काम करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी महिलादेखील पुजारी म्हणून काम करतात. परंतु, पहिल्यांदाच एक रोबोट पुजारी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या रोबोट पुजाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Esakal