येत्या काही काळात मानवापुढे अन्नसंकट उभं राहणार असून त्याच्यावर किड्या-मुंग्या खाण्याची वेळ येणार आहे, असं काही दिवसांपूर्वी केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे आता भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी काही रेस्टरंटमध्ये (restaurant) आतापासून किड्यांपासून तयार केलेली डिश ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. यात नवल म्हणजे अनेक जण किड्यांची ही डिश एन्जॉय करुन खात आहेत. (french-restaurant-serves-up-food-of-the-future-insects)
जेवत असतांना अचानकपणे तुमच्या ताटात केस किंवा किडा, आळी आढळून आली तर सहाजिकच पुन्हा तो पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही. परंतु, फ्रान्समधील एका रेस्टरंटमध्ये खास किड्यांनी सजवून दिलेले पदार्थ ग्राहकांना सर्व्ह केले जात आहे. इतकंच नाही तर ग्राहकांनादेखील हे पदार्थ आवडत आहेत.

फ्रान्समधील एका रेस्टरंटच्या लॉरेंट वियत या शेफने त्याच्या टेस्टिंग मेन्यूमध्ये किड्यांपासून तयार केलेल्या काही पदार्थांचा समावेश केला आहे. यात पिवळ्या रंगाचे मीलवर्म, भाज्यांसोबत फ्राय केलेल किडे, चॉकलेटमध्ये घोळवलेले नाकतोडे या पदार्थांचा समावेश आहे.
“अनेक जणांना मीलवर्म पीठापासून तयार केलेला पास्ता, रताळं आणि किंचित परतलेल्या लार्वाची डिश दिली जाते. विशेष म्हणजे या डिश ग्राहकांना आवडत आहेत”, असं वियतने सांगितलं.
Also Read: ऐकावं ते नवलंच! रोबोट करतो मंदिरातील देवांची पूजा
वियत या मीलवर्मला मोठं करुन त्यांना दलिया, ओट्स आणि भाज्यांसोबत सर्व्ह करतात. प्रत्यक्षात दिसतांना हे फार विचित्र दिसतं मात्र, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रोटिन, फॅट आणि फायबर आहे.
मी एखाद्या पारंपरिक रेस्टरंटमध्ये असल्याचा फिल मला या ठिकाणी आल्यावर झाला. मी जे काही खातोय ते काही तरी वेगळं पण अत्यंत सुंदर आहे असं जाणवलं. आणि, खरं सांगायचं तर याची चव बऱ्यापैकी दररोज आपण खात असलेल्या पदार्थांप्रमाणेच लागते, असं वियत यांच्या रेस्टरंटला भेट देणाऱ्या सोहेल अयारी यांनी सांगितलं.

दरम्यान, युरोपच्या अन्न सुरक्षा यंत्रणेने मीलवर्क किडे खाण्यायोग्य असल्याचं जानेवारीमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर मीलवर्म किड्यांच्या विक्रीसाठीही मे मध्ये परवानगी देण्यात आली होती.
Esakal