नागपूर : पाणी हेच जीवन आहे’ (Benefits of drinking water) आपण नेहमीच म्हणत असतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पाणी पिल्याशिवाय आपण जगू शकत नाही. अनेकदा खूप थकल्यावर आपल्याला सर्वात आधी भूक लागण्याऐवजी तहान लागते. पाणी आपल्या शरीरासाठी (way to drink water) अमृत आहे. मात्र पर्यावरणाला हानी पोहोचवत आता मनुष्यानं पाण्याचा अतिवापर करून आणि अपव्यय केल्यामुळे (Wastage of water) आता पृथ्वीवरचा (Earth water) पिण्यायोग्य पाण्याचा साठा संपत चालला आहे. जगातील काही भागांमध्ये तर अक्षरशः कोरडा दुष्काळ पडू लागला आहे. आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ काही वर्षं पुरेल इतकाच पिण्यायोग्य पाण्याचा साठा (Drinkable water source) पृथ्वीवर शिल्लक आहे.(Scientist told year when drinkable water on earth get vanished)
Also Read: डॉक्टरांशी ऑनलाइन कन्सल्ट करताना ‘या’ गोष्टी नक्की ठेवा लक्षात

डेन्मार्कच्या एका युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पृथ्वी हळूहळू कोरड्या दुष्काळाकडे जातेय. पृथ्वीवर समुद्र हा सर्वात मोठा पाण्याचा स्रोत आहे. मात्र हे पाणी अजूनतरी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नदी, जमिनीखालच्या झऱ्यांमधूनच आपल्याला पिण्यायोग्य पाणी मिळतं. मात्र आता ग्लोबल वॉर्मिंग आणि इतर वाढत्या उष्णेतमुळे जमिनीच्या खालचे झरे आटत चालले आहेत.
तसंच प्रदूषणामुळेही स्वच्छ पाणी दूषित होत आहे. तसंच वाढत्या लोकसंख्येमुळे, पाण्याच्या अपव्ययामुळे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशनला मोठ्या प्रमाणावर (-पाण्याचा उपयोग केला जात असल्यामुळे स्वच्छ पाणी कमी होत चाललं आहे.इतकंच नाही तर पाण्याच्या अतिवापर हानिकारक ठरत आहे. एक किलो चॉकोलेट बनवण्यासाठी तब्बल २४ हजार लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तर एक किलो बिफसाठी १४ हजार लिटर वाया जातंय.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, येत्या २०४० पर्यंत पृथ्वीवरील संपूर्ण पिण्यायोग्य पाणी नष्ट होणार आहे. आपल्याकडून पाण्याचा अपव्यय असाच चालू राहिला तर एक दिवस या जगात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल ही शक्यता नाकारता येत नाही.
Also Read: अवघ्या ५००० रुपयांत द्या भारतातील या टॉप पर्यटन स्थळांना भेट

म्हणूनच आपण सर्वांनीच आतापासूनच पिण्यायोग्य पाणी जपून वापरण्याची गरज आहे. तसंच जुनं पिण्याचं पाणी न फेकता तेच पाणी दैनंदिन गरजेसाठी वापरण्याची गरज आहे. तसंच ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेचा वापर करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसं जाईल याबद्दल विचार करावा लागेल. अन्यथा एक दिवस जीवनासाठी पाणी मागण्याची वेळ येईल हे नक्की.
Scientist told year when drinkable water on earth get vanished)
Esakal