मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Actor Dilip Kumar) यांना रविवारी मुंबईतील (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आलं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे सकाळी ८.३० वाजता त्यांना रुग्णालयात दाखल (Admit) केलं. याविषयी अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी माहिती दिली. हे वृत्त समजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी रूग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ‘श्वसनाच्या त्रासामुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना उपचारासाठी खार हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीची रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यांच्या सायरा बानोदेखील तेथे होत्या. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो हीच प्रार्थना’, असं ट्विट करत त्यांनी माहिती दिली. (NCP Chief Sharad Pawar heads to Hinduja hospital checks on Actor Dilip Kumar health)

Also Read: एकनाथ खडसे यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

“दिलीप कुमार यांनी श्वास घेतांना त्रास जाणवत होता. त्यामुळे आज सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा निश्चितच सोबत आहेत. ते लवकरच बरे होतील”, अशी माहिती सायरा बानो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सकाळी सांगितले. गेल्या वर्षभरामध्ये दिलीप कुमार यांना प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Also Read: अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘एव्हरग्रीन कपल’ म्हणून ओळखले जातात. दिलीप कुमार यांच्या आजारपणात सायरा बानो त्यांची खूप काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘मुघल-ए-आझम’, ‘राम और श्याम’, ‘कर्मा’ अशा अनेक चित्रपटात दिलीप कुमर यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here