बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी काही दिवसांपुर्वीच लग्नगाठ बांधली. यामीच्या मेंहदी आणि हळदी समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामीने शेअर केलेल्या हळदी समारंभाच्या फोटोमध्ये तिची बहीण सुरीली तिला हळद लावताना दिसत आहे. यामीने हातात नवरीचा चुडा आणि लाल घागऱ्यामधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोला अभिनेता विक्रांत मेस्सीने कमेंट केली,’राधे मां सारखी शुद्ध आणि धार्मिक दिसत आहेस.’ विक्रांतच्या या विनोदी कमेंटवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. हळदी समारंभासाठी यामीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. हातावर काढलेल्या मेंहदी दाखवतानाचा फोटो यामीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.