• बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचीही संख्या कमी

मुंबई: शहरातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळवणारी पालिका आता हळूहळू म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीवर (Black Fungus) नियंत्रण (Control) मिळवण्यातही यशस्वी ठरत आहे. जनजागृती (Awareness) आणि वेळेवर उपचारांमुळे (Timely Treatment) रुग्ण बरे होत आहेत तर नवीन रुग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. पालिका प्रशासनाने (Mumbai BMC) केलेल्या दाव्यानुसार, काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. सध्या दररोज 2 ते 10 म्युकरमायकोसीसचे रुग्ण दाखल होत आहेत. बाहेरील रुग्ण येणाऱ्यांची संख्या ही कमी झाली आहे. त्यामुळे, म्यूकरमायकोसिसचा मुंबईतील वेग कमी होताना दिसत आहे. (Mucormycosis patients numbers are falling in Mumbai says Mumbai BMC)

Also Read: Bandra – इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित झाल्यानंतर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने पसरत आहे. कोरोनामधून बरे झालेले रुग्ण काळ्या बुरशीच्या आजाराने ग्रस्त होत आहेत. दरम्यान, हा आजार ही नियंत्रित करण्यासाठी पालिकेने एक आराखडा तयार केला आणि त्याची अंमलबजावणीही केली. कोरोनाप्रमाणेच, म्यूकरमायकोसिस नियंत्रित करण्यासाठी पालिकेने एक टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याशिवाय, काळ्या बुरशीने ग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी पालिकेने आपल्या प्रमुख रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार केले आहेत. इतकेच नाही तर प्रभागाच्या पातळीवरही या आजारासंदर्भात जनजागृती सुरू करण्यात आली. या जनजागृतीच्या माध्यमातून पालिका कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची काळजी कशी घ्यावी? कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती दिली. या कारणांमुळे मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आलेख कमी होत आहे.

Also Read: Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.13 टक्क्यांवर

Mucormycosis

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी साांगितले की, पूर्वी 50 ते 100 रुग्ण दररोज उपचारासाठी मुंबईतील आणि मुंबईबाहेरील रुग्णालयात दाखल होत होते. आता मात्र ,7 ते 10 रुग्ण दररोज येत असल्याने हा आलेख खाली येत आहे. काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, काळ्या बुरशीचे 376 रुग्ण मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल आहेत. यातील मुंबईतील 121 आणि मुंबईबाहेरील 255 रुग्ण दाखल आहेत. पूर्वी ही संख्या 400 च्या वर होती. आतापर्यंत या बुरशीने 70 लोकांचा बळी घेतला आहे ज्यामध्ये 21 रुग्ण मुंबईचे आहेत. तर, मुंबईबाहेरील 49 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना नियंत्रित झाल्यानंतर एका महिन्यात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली होती, परंतु आता ही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.

Also Read: मुंबई लोकल यंदा पावसाळ्यात खोळंबणार नाही!

काळ्या बुरशीने ग्रस्त रूग्णांच्या उपचारांसाठी केंद्र सरकारने प्रभावी अ‍ॅम्फोटेरोसिन इंजेक्शन पाठवली आहेत. आता हे इंजेक्शन केंद्रातून रुग्णांच्या संख्येच्या आधारे राज्यांना पुरवले जात आहे. मुंबई पालिकेला आतापर्यंत 4700 इंजेक्शन्स पुरवले गेले आहेत.

Also Read: “जसे मुंबईत बाळासाहेब ठाकरे, तसेच नवी मुंबईत दि. बा. पाटील”

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here