मालवण – दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री. देवी भराडी मातेच्या यात्रोत्सवास पहाटे पासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे आंगणेवाडीत भक्तांचा मेळा फुलला आहे.
दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या यात्रोत्सवाचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्यात दाखल झाले असून आज पहाटेपासूनच आंगणेवाडीत दर्शनासाठी गर्दी केली होती. देवीची ओटी भरण्यासाठी पहाटेपासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांना तत्काळ देवीचे दर्शन घेता यावे यासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात भाविकांना देवीचे दर्शन घेता आले.
देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांचा जनसागर आंगणेवाडीत लोटला आहे. सकाळच्या सत्रात भाजपचे माजी मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, भाई गिरकर, राजन तेली, अतुल काळसेकर, माजी महापौर दत्ता दळवी, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेता अरुण मोरे, सुशांत शेलार, किरण पावसकर, आमदार वैभव नाईक,
यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित नेत्र चिकित्सा, चष्मा वाटप, मधुमेह तपासणी शिबिराचे उदघाटन श्री. तावडे, श्री. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचा – जगाला हेवा वाटेल असं कोकण बनवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह
शिवसेना, भाजपचे राज्यातील नेतेमंडळी, सिने अभिनेते यांच्यासह अन्य कलाकार यात्रेत उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणार असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने व्यावसायिक आंगणेवाडीत दाखल झाले असून त्यांनी मंदिर परिसरात आपली दुकाने थाटली आहेत. याशिवाय मनोरंजनाचे साधनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

News Story Feeds