अनेकदा स्वयंपाक करण्याचा किंवा घरच्या जेवणाचा कंटाळा आला की आपण लगेच हॉटेलमधून ऑर्डर करतो. सध्याच्या काळात बाहेरील खाद्यपदार्थांची डिलीव्हरी करणारे अनेक फूड डिलीव्हरी अॅप सुद्धा आहेत. मात्र, बऱ्याचदा कम्युनिकेशन गॅप किंवा अन्य काही कारणांमुळे ग्राहकांपर्यंत चुकीची ऑर्डर पोहोचवल्याचेही किस्से घडले आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक किस्सा चर्चिला जात आहे. फूड अॅपने चिकन फ्राय मागवणाऱ्या एका महिलेला प्रत्यक्षात मिळालेला पदार्थ हा थक्क करणारा आहे. (philippines-woman-shocked-by-deep-fried-towel-in-chicken-order-watch-viral-facebook-post)
फिलिपिन्स येथे राहणाऱ्या Alique Perez या महिलेने ऑनलाइन फूड अॅपच्या मदतीने फ्राइड चिकनची ऑर्डर दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तिला चिकनऐवजी चक्क फ्राइड टॉवेल (deep-fried-towel) देण्यात आला आहे. होय. ऐकतांना ही घटना कितीही विचित्र वाटत असली तरीदेखील या महिलेसोबत हा किस्सा घडला आहे. तिला चक्क फ्राइड टॉवेल, चिकन म्हणून देण्यात आला आहे. याविषयी या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Also Read: ‘या’ व्यक्तीमुळे रुजली महिलांमध्ये जीन्सची फॅशन
“मी माझ्या मुलासाठी चिकनची ऑर्डर दिली होती. पार्सल आल्यानंतर हे चिकन कट करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, हे चिकन कट होणं अशक्य असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी हाताने कट करण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक प्रकार माझ्यासमोर आला. फ्राइड चिकनऐवजी मला फ्राइड टॉवेल देण्यात आला होता”, असं Alique ने सांगितलं.
दरम्यान, Alique यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये खरंच फ्राइड चिकनऐवजी टॉवेल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी या कंपनीवर ताशेरे ओढले असून कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला Alique यांना दिला आहे. Alique यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात असून त्याला ८७ हजार शेअर आणि १ लाखापेक्षा जास्त रिअॅक्शन मिळाल्या आहेत.
Esakal