पुणे : शहरातील ८६ टक्के गेमर्स मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळतात. त्याशिवाय ५६ टक्के गेमर्सनी ऑनलाइन गेम्समध्ये सातत्याने खेळ जिंकण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग शोधावा लागत आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ) या ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या सर्वोच्च संघटनेने ‘ऑनलाइन गेमिंग इज अ लाइफ स्कील’ हा अहवाल तयार केला आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली. अहवालात गेमर्सद्वारे जीवनकौशल्ये समजली जाणारी कौशल्ये समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर गेमर्स कशाप्रकारे ही कौशल्ये आत्मसात करतात, कामाच्या ठिकाणी अशी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी त्यांना मदत झाली का आणि यापैकी कोणती कौशल्ये गेमिंगच्या माध्यमातून आत्मसात केली जाऊ शकतात हे मांडण्यात आले आहे. (Online gaming is a life skill great for careers and skills report by all India gaming federation)

Also Read: सेंट्रल विस्टा प्रकल्पाबाबतचे ‘भ्रम आणि वास्तव’; मोदी सरकारने दिली सविस्तर माहिती

अहवालातील ठळक बाबी

– गेम खेळताना जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग सतत शोधावा लागत असल्यामुळे त्यातून विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होत असल्याचे ७६ टक्के गेमर्सचे मत

– ५७ टक्के गेमर्सच्या मते कामाच्या ठिकाणी मिळत असलेल्या कौशल्याप्रमाणे ऑनलाइन गेम्स खेळतानाही व्यक्तीला आवश्यक असलेले कौशल्य विकसित करता येतात

– प्रतिक्षिप्त क्रिया आणि स्मृती सारखे शारीरिक व मानसिक कौशल्ये जास्त महत्त्वाचे असल्याचे ५१ टक्के स्त्रियांचे मत

– धोरण, लॉजिक, जोखीम व परताव्यांचे आकलन, निश्चय सारखी कौशल्ये ऑनलाइन गेमर्ससाठी महत्त्वाचे असल्याचे ६७ टक्के पुरुषांचे म्हणणे

Also Read: पवार साहेब आमचे मार्गदर्शक – बाळासाहेब थोरात

आवश्यक कौशल्ये (टक्केवारीत)

– प्रतिक्षिप्त क्रिया -६५

– लॉजिक – ६७

– निश्चय – ५३

– जोखीम व परताव्यांचे आकलन – ५२

– उत्तम स्मरणशक्ती – ६४

छंदाचे करिअरमध्ये रूपांतर

चारमधील एका गेमरला ऑनलाइन गेमिंग हा व्यवहार्य व्यवसाय वाटतो आणि हे या व्यवसायात आलेल्या बदलाचे प्रतीक म्हणता येईल. गेल्या वर्षी झालेला लॉकडाउन व सोशल डिस्टन्सिंगमुळे गेमिंगच्या छंदाचे पूर्ण वेळ करिअरमध्ये रूपांतर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आज ईस्पोर्ट्स कंपनीबरोबर करार करणाऱ्या व्यावसायिक गेमरला महिना ५००० ते ४५,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवता येते. लोकप्रिय मोबाईल गेम २०१९ भारतीय मालिकेत प्रादेशिक अंतिम फेरीतील टीमने ५,५०,००० रुपयांचे बक्षिस जिंकले होते.

निर्णायक विचारशक्ती, सर्जनशील विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण ही सर्व कौशल्ये प्रत्येकाच्या आयुष्यात विकासासाठी महत्त्वाची असतात. या संशोधनाच्या मदतीने आम्ही ग्राहकांना मोबाईल गेमिंगचे मूल्य खरंच समजले आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या अभ्यास अहवालामुळे आम्हाला गेमिंग हे लोकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी व करिअर उभारण्यासाठी उत्तम क्षेत्र असल्याचे लक्षात आले.

– रोलँड लँडर्स, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here