प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या राजी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर विकी कौशल, जयदिप अहलावत या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक एका महिला गुप्तहेरच्या आयुष्यावर आधारित आहे. हरिंदर सिंग सिक्का यांनी लिहिलेल्या ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तयार केलेल्या ‘बेबी’ या टीमच्या कामगिरीवर आधारित चित्रपटाची काल्पनिक कथा आहे. या टीमचे नेतृत्व अजय सिंग नावाचा एक अधिकारी करतो. अजय सिंग नावाची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला.‘द 39 स्टेप्स’ हा चित्रपट 1935 मध्ये प्रदर्शित झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे कथानक गुप्तहेर रिचर्ड हॅनावर आधारित आहे. रिचर्ड हॅनाची भूमिका अभिनेता रॉबर्ट डोनेट यांनी साकारली आहे.स्पाय किड्स या चित्रपटाचे कथानक लहान मुलांवर आधारित आहेत. ही लहान मुले गुप्तहेर कसे होतात? ते या चित्रपटामध्ये दाखवले आहे. ग्रेगोरिओ आणि इंग्रीड या दोघांना 12 वर्षांचा कार्मेन नावाचा मुलगा तर 9 वर्षाची ज्युनी नावाची मुलगी असते. या चित्रपटामध्ये ग्रेगोरिओची भूमिका अँटोनियो बँडेरासने आणि इंग्रीडची भूमिका कार्ला गुगिनो याने साकारली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या टिंकर, टेलर, सोल्जर, स्पाय या चित्रपटामध्ये शितयुद्धादरम्यान गुप्तचरांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये जॉन हर्ट,मार्क स्ट्रॉन्ग, गॅरी ओल्डमॅन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. झिरो डार्क थर्टी हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जेसिका चेस्टाईनने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘मिशन इम्पोसिबल फॉलआऊट’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता टॉप क्रुझने प्रमुख भूमिका साकरली आहे. मिशन इम्पॉसिबलच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या भागाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सायमन पेग, विंग रामेस, रेबेका फर्ग्युसन, मिशेल मोनाघन या कलाकारांनी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये सलमानने ‘टायगर’ नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफने देखील काम केले आहे. कतरिनाने ‘जोया’ नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. जोया पाकिस्तानची तर टायगर हा भारताचा गुप्तहेर असतो. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. या चित्रपटातचे लेखन आणि दिग्दर्शन कबीर खानने केले आहे.