सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : तालुक्यात पुन्हा माकडतापाने डोके वर काढले असूृन, माकडतापसदृश तीन रुग्ण सापडले आहेत. दोघांना गोवा येथे पाठविण्यात आले आहे. या तापाच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासले जात आहेत.
हेही वाचा– असा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा… –
रूग्ण लक्ष्मण भागू शिंदे (वय ७०), निकीता लक्ष्मण शिंदे (५०, रा. पडवे माजगाव) व महादेव सावंत (६२, असनिये) या रुग्णांना माकडतापाची लक्षणे पॉझिटिव्ह आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून माकडतापचे रुग्ण सापडत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यत तीन माकडतापसदृश रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत निदान झाल्यानंतर तातडीने या रुग्णांना बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले.
हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही भूमिका ऐकूण घेणार काय…? –
माकड तापावर निदानाची यंत्रणा नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा हंगाम सुरु झाल्यावर माकडताप डोके वर काढतो. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. सद्यस्थिती पाहता सिंधुदुर्गात माकड तापावर लवकरात लवकर निदान करणारी कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे माकडतापाचे निदान होईपर्यंत याआधी अनेक रुग्णांना जीव गमवावे लागले आहेत.

News Story Feeds