तुम्ही फक्त तंदरुस्त(Fit) किंवा निरोगी राहण्यासाठी वजन कमी (Weight loss) करत असला तरी शेवटी हेतू कॅलरीज् बर्न करणे असतो. शरीराचा आकार कम करण्याच्या हेतूने कित्येक लोक अवघड वर्कआउट करतात पण, जेव्हा वजन कमी करतो तेव्हा हळू हळू व्यायामास सुरवात करणे चांगले असते. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताना तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत अशा काही टिप्स, नक्की ट्राय करा.

व्यायाम कधी करावा?
वजन कमी करताना डाएट आणि व्यायाम दोन्ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात. वजन कमी करण्यासाठी दोन्हीचे पालना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतू, सुरूवातीला तुम्हाला हळू हळू सुरवात करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: बर्याच कॅलरी कमी करण्यासाठी तुम्ही डाइटिंग सुरू केली असेल कोणत्याही कसरत(व्यायाम) पद्धतीस सुरु करण्यापूर्वी एक किंवा दोन आठवडा थांबा. डाएट आणि त्यात बरेच बदल केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित कसरत सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बदलांशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. डाएट आणि व्यायाम दोन्ही एकत्र सुरु केल्यास तुमच्या शरीरास दुखापती होण्याची शक्यता असून तुमची प्रेरना देखील कमी होऊ शकते.

फक्त व्यायाम पुरेसा नाही
नियमित ठरलेल्या वेळनुसार आणि सातत्याने व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. पण फक्त वर्कआऊट करणे आणि दिवसभर आराम करण्यामुळे तुम्ही निरोगी(हेल्दी) राहू शकत नाही. दिवसभर अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. घरातील छोटी-मोठी कामे करा, थोड्यावेळ चालायला जा, झाडे लावा, गॉसरी शॉपिंग करा. अशी कामे करत राहिल्या तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहाता त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजही कमी होतात.

ट्रेंडी व्यायाम फॉल करु नका
वजन कमी करताना ट्रेंडमध्ये असलेले वर्कआउट करु नका. फॅन्सी वजन कमी करण्याचे वर्कऑउटला रोज प्रसिध्दी मिळते पण,तुमच्या शरीराला आकार(shape) देण्यासाठी आवश्यक नसतील. तसेच अवघड व्यायामाची दिनचर्या बंद केल्यानंतर त्रास वाढण्याची शक्यता असते. जे व्यायाम किंवा शारीरीक हलचाली करताना तुम्हाला आनंद होतो तेच करा. आवडीच्या गोष्टी फॉल केल्याने असल्याने तुम्ही उत्साहाने व्यायाम करता.

तुमच्या वर्कऑउट सुधारणा करा
वेळोवेळी तुमच्या वर्कआउटमध्ये बदल केल्यास तुमच्या शरीरास आव्हान देण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला तेच तेच वर्कआऊट करण्याचा कंटाळा आला असेल, तुम्हाला या वर्कऑउटचा काही फायदा होत नसले तर तुम्ही कोणतीही नवीन वर्कऑऊट फॉलो करु शकता. वर्कऑऊट करताना वेळोवेळी ब्रेक घेतला पाहिजे जेणेकरुन तुमच्या स्थायूंना काही वेळ आरामही मिळतो. नियमितपण तुमचे वर्कऑउट फॉलो करण्याचा प्रयत्न करा.

Esakal