आर अश्विन सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत येत नाही, असे वक्तव्य करुन माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी नवा वाद ओढावून घेतलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. 2019 वर्ल्ड कपदरम्यान (ICC World Cup 2019) रविंद्र जडेजा आणि भारताचे माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यात वाद निर्माण झाला होता. वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना मांजरेकर यांनी जडेजा ‘बिट्स अँण्ड पिसेस’ म्हणजे थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू असल्याचं वक्तव्य केलं होतं. बीसीसीआयच्या गाईडलाईन्सचा विसर पडल्यामुळे त्यांना पॅनलमधून हटवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा रंगली होती. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जेव्हा-जेव्हा मोठी खेळी करतो तेव्हा तेव्हा मैदानात बॅटने तलवारबाजी करून तो सेलिब्रेशन करतो. त्याचा हा तोरा संजय माजरेकरांना सणसणीत टोला लगावणारा असाच आहे.त्यानंतर संजय मांजरेकर यांना BCCI च्या कॉमेंट्री पॅनलमधून डच्चू देण्यात आला होता. यावर चेन्नई सुपर किंग्जने ‘आता ऑडिओ फिड बिट्स ऍण्ड पीसेस मध्ये ऐकायची गरज नाही,’ असं खोचक ट्विट करत मांजरेकरांना ट्रोल केल होते. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर असताना दिल्ली कॅपिटल्सशी हितसंबंध असल्याप्रकरणात संजय मांजरेकर यांनी सौरव गांगुली यांच्यावरही टीका केली होती. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्यातील वादही चांगलाच गाजला होता. कोलकात्यामध्ये झालेल्या डे-नाईट टेस्ट मॅचदरम्यान गुलाबी बॉलवरून भोगले यांनी एक वक्तव्य केले होते. समोर व्हाईट साइड स्क्रीनमुळे गुलाबी चेंडू खेळताना काही व्यत्यय निर्माण होतो का? यासंदर्भात खेळाडूंच मत जाणून घ्यायला हवे, असे भोगले म्हणाले होते. यावर 10-15 वर्ष क्रिकेट खेळल्याचे सांगत आम्हाला विचारा? असे मांजरेकर म्हणाले होते. शिकण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी क्रिकेट खेळणे हा निकष लावता येत नाही, असा टोला यावेळी भोगलेंनी लगावला होता. त्यानंतर माजरेकरांनी त्यांची माफीही मागितली होती.