French Open 2021 : पॅरिसमध्ये सुरु असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत मोठा उलटफेर करणाऱ्या निकालाची नोंद झाली. एका बाजूला स्वित्झर्लंडच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या रॉजर फेडरर (Roger Federer) दुखापतीमुळे माघार घेतली. तर दुसरीकडे महिला गटात 24 वेळा ग्रँडस्लम जिंकून विश्वविक्रमी रेकॉर्डची बरोबरी करण्याची सरेना विल्यम्सनची संधी हुकली. अमेरिकेची स्टार टेनिसपटून सेरेना विल्यम्सला (Serena Williams) कझाकिस्तानच्या 21 वर्षीय खेळाडूने पराभवाचा धक्का दिला. सेरेनाला सरळ सेटमध्ये पराभूत करत एलेना रिबॅकिना ((Elena Rybakina)) क्वार्टर फायनलमध्ये पोहचलीये.
पॅरिसमध्ये सुरु असलेल्या वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून सुरुवातीपासून दिग्गज खेळाडू बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. महिला टेनिस जगतातील नंबर दोनची जपानची खेळाडू नाओमी आसोकाने डिप्रेशचा सामना करत असल्यामुळे माघार घेतली होती. त्याच्यानंतर महिला गटातील अव्वल मानांकित बार्टीनेही दुखापतीमुळे माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. रॉजर फेडररलाही दुखापतीमुळे कोर्ट सोडावा लागला. तर सेरेनाला नव्या दमाच्या एलिनाने पराभवाचा धक्का देत बाहेरचा रस्ता दाखवला.

Also Read: संजय मांजरेकरांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका!
महिला एकेरीत 23 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विरुद्धच्या सामन्यात एलेनाने सुरुवातीपासून दमदार खेळ दाखवला. पहिल्याच सेटमध्ये तिने सेरनाला 6-3 असे मागे टाकले. मोठ्या कारकिर्दीत अनेक सामन्यात असा संघर्ष करणाऱ्या सेरेना दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करेल, असे वाटत होते. दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने तशी सुरुवातही केली. पण एलेनाने संधीच सोन करत खेळात आणखी सुधारणा करुन सेरेनाला बॅकफूटवरच ठेवले. दुसऱ्या सेटमध्ये दोघींमध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळाला. पण अखेर एलिनाने सेट 7-5 असा आपल्या नावे केला. या विजयासह एलेनाने पहिल्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅमच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.

Also Read: अभिमानास्पद! मुंबईकर जेहाननं रचला इतिहास; F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय
महिला आणि पुरुष यांच्यामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन दिग्गज महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या नावे आहे. त्यांनी 24 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. 39 वर्षीय सेरेनाला या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी आता आणखी काहीवेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. 2017 मध्ये सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या रुपात अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सातत्याने तिच्या पदरी निराशा येताना दिसत आहे.
Esakal