देऊर : लोणखेडी (ता.धुळे) येथील शेतकरी (Farmer) केदारेश्वर पुंडलिक पाटील यांची बारा एकर लोंढा शिवारात शेती (Agriculture) आहे. ऊस शेतात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या (Leopard) नर व मादी पिलांसह वास्तव्यास आहेत. या क्षेत्रात उच्छाद मांडला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाला (Forest Department) दोनशे शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देत बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र याबाबत ठोस उपाययोजना वनविभागाने अद्याप केली नाही. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतमजूर शेतात कामाला येत नाही. पर्यायाने बाजरी कापणी झाली नाही. पक्ष्यांनी कणसावरच दाणे टिपून संपवली. ऊसाला खेडता येत नसल्याने पाणी देता येत नाही. ऊस क्षेत्र जळण्याच्या मार्गावर आहे. कापूस लागवड नाही. अशा विविध समस्या उभ्या टाकल्याने आम्ही शेती कशी करावी बागायत क्षेत्र ओसाड पडेल असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे उपस्थित केला आहे. (farmers scared by leopard scare farming in danger)
Also Read: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नाही
काही दिवसापूर्वी मेंढपाळावर दिवसा बिबट्याने हल्ला चढविला. शेतकरी अरविंद पाटील यांच्या शेतात सायंकाळी साडेसात वाजता रोटाव्हेटर चालू असतांना बिबट्या ट्रॅक्टरवर येऊन बसला. अशा दररोज घटनेतून बिबट्याई जोडी जीवघेणी समस्या उभी करीत आहे. दुसरीकडे रात्री सिंगल फेज वीज नाही. शेतात दिवसा सुद्धा शेतमजूर काम करण्यास नकार देत आहे. चारवेळा मजूर शेतातून परत गेले. एकंदरीत शेतकरी कोंडीत सापडला आहे. या समस्यांबाबत जिल्हाधिकारी संजय यादव, वनविभाग, सिंगल फेज वीजसाठी उप कार्यकारी अभियंता, आमदार कुणाल पाटील यांना निवेदन दिले आहे.

ठोस उपायोजना आवश्यक
वनविभागाने वनपाल, वनरक्षक, वनमजूर कर्मचारी पाठवून पावलांचे ठसे, व्हिडिओ चित्रीकरण केले. अधिक माहिती जमा करून कार्यालयास दिली आहे. मात्र पिंजरा लावल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी नागपूरहून परवानगी हवी आहे. नावापुरता एकच कॅमेरा लावला. दोन ते तीन कॅमेरे काही दिवस लावले जावेत. ठोस उपाययोजना हव्यात.
Also Read: चक्क शेतमजूर महिलांनी केले कामबंद; ग्रामपंचायतीवर काढला मोर्चा
” बिबट्याई जोडीच्या दहशतीने अडीच एकर बाजरी कापणी झाली नाही. ऊस क्षेत्र जळत आहे. शेतीची मशागत होत नाही. शेतमजूर रोख पैसे देऊन येत नाही. शेती सोडण्याची वेळ आली आहे.दररोज वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आपबिती सांगत आहे. तक्रारीची दखल घ्यावी.” – – – -केदारेश्वर पाटील, शेतकरी लोणखेडी (ता.धुळे)
Esakal