निमसोड (सातारा) : संपूर्ण राज्यभर काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) पेट्रोल, डिझेल व गॅस (Petrol, Diesel And Gas) इंधन दरवाढीविरोधात पेट्रोल पंपांवरती आंदोलन करुन घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेवरुन राज्यभर मोदी सरकारचा आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, म्हसवड, दहिवडी, पळशी व फलटण येथे आंदोलन करण्यात आले. (Congress Party Agitation Against Modi Government Petrol And Diesel Price Hike In Nimsod And Phaltan)

निमसोडमध्ये आज कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोलपंपावर इंधन दरवाढ व केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करत “केंद्र सरकार हटाव, नरेंद्र मोदी हटाव’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

खटाव-माण तालुक्यामध्ये कॉंग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख (Ranjitsingh Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. पळशी येथील आंदोलनावेळी देशमुख म्हणाले, कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या जनतेवरती या अन्यायकारक इंधन दरवाढीमुळे महागाईचे अस्मानी संकट कोसळले आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या करापोटी लाखो कोटी रुपये गोळा करून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या दरीत लोटले आहे.

Also Read: सातारकरांनाे! संयम बाळगा, नाही तर पुन्हा लॉकडाउनच्या छायेत

केंद्रात यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसचे पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांनी कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असताना देखील देशात पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर राखून सामान्य जनतेला दिलासा दिला होता. मात्र, याउलट आत्ताच्या मोदी सरकारने कच्च्या तेलाचे भाव पन्नास टक्क्यांहून कमी असताना देखील देशात पेट्रोल-डिझेलची विक्रमी दरवाढ करून सर्व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. यापुढेही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. यावेळी मोदी सरकारविरोधात लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ के पार.., पेट्रोल-डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार असे निषेध व्यक्त करणारे फलक व घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Also Read: ‘कुटुंबांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू’

Congress Party

फलटण शहर : इंधन दरवाढी विरोधात आज येथे कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीचा व केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करून “केंद्र सरकार हटाव, नरेंद्र मोदी हटाव’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके, तालुका कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, तालुका ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, शहराध्यक्ष मोहित बारशीकर, अल्पसंख्याक सेलचे फलटण तालुकाध्यक्ष ताजुभाई बागवान, शहराध्यक्ष अलताब पठाण, पंकज पवार, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजिंक्‍य कदम, फलटण शहराचे युवक अध्यक्ष प्रीतम जगदाळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Congress Party Agitation Against Modi Government Petrol And Diesel Price Hike In Nimsod And Phaltan



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here