युरोपियन क्रिकेट सीरीज (European Cricket Series) मधील टी-10 स्पर्धेत सोमवारी नव्या विक्रमाची नोंद झालीये. सलामी फलंदाज अहमद मुसाद्दीक (Ahmed Musaddiq) ने 28 चेंडूत शेतकी खेळी केली. डावाची सुरुवात करणाऱ्या अहमद शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने आपल्या धमाकेदार खेळीत 33 चेंडूत 115 धावांची खेळी केली.

अहमदने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. अभिनंदन झाच्या पहिल्या षटकात त्याने 26 धावा कुटल्या. त्यानंतर त्याने आपल्या फटकेबाजीत धमाका शेवटपर्यंत सुरुच ठेवला. डावातील पाचव्या षटकात बेहरम अलीच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार खेचून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या धमाकेदार खेळीत त्याने 13 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी केली.

Also Read: टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्यावरील प्लॅन ठरला!

मुसाद्दीक (Ahmed Musaddiq) याने केलेलली ही या लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर कुमरफील्‍ड स्‍पोर्ट्स वेरियनने निर्धारित 10 षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात 198 धावा केल्या. यापूर्वी युरोपियन क्रिकेट सीरिजच्या इतिहासात 29 चेंडूत शतकी खेळीचा विक्रम होता. इंडियन क्रिकेट क्लबचा फलंदाज लेबाज गौहर याने 29 चेंडूत शतक झळकावले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here