कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठामध्ये Shivaji University ज्या विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्‍या ऑक्टोंबर, नोव्हेंबर 2020 हिवाळी सत्रा करिता यापूर्वी ऑफलाइन (Offline exam) पद्धतीने परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे .किंवा कोणताच पर्याय निवडला नाही .अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑनलाइन परीक्षा (online exam) देता येणार आहे. यासाठी विद्यापीठाने आज परिपत्रक काढले आहे.(shivaji-university-online-exam-last-date-update-marathi-news)

या परिपत्रकामध्ये असे म्हटले की,ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताच आली नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार आहे. यासाठी यूजीसीच्या ६ मे 2019 च्या निर्देशानुसार ऑफलाइन परीक्षा देता न आलेल्या परीक्षार्थींची covid-19 च्या पार्श्‍वभूमीवर शेवटची संधी म्हणून फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- दूध दरासाठी गुरुवारी राज्यभर आंदोलन ; सदाभाऊ खोतांची माहिती

विद्यापीठ विभाग संलग्नित महाविद्यालय दूरशिक्षण केंद्रा तील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडण्यासाठी दिनांक 13 /6/ 2021 रोजी दिलेल्या वेळेत पर्याय निवडावा लागणार आहे. विद्यापीठाने दिलेल्या लिंक वर ती पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर कन्फर्मेशन रिसीट ची प्रिंट विद्यार्थ्यांना आपल्यासोबत ठेवायची आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा पर्यायासाठी खालील लिंकचा वापर करावा

Web Page- http://www.unishivaji.ac.in/online_portal/

Winter 2020 imp links for students

Link- Update Student Mobile No.,Email ID for Re- examination(Offline to online)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here