नुकतेच माधुरी दीक्षितने एका लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहे. या साडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या लूकमध्ये माधुरीने पर्ल आणि कलरफुल स्टोनचे नेकलेस घातले आहे. तसेच तिने कानात हिरव्या रंगाची ज्वेलरी घातली आहे.. स्लिव्हलेस ब्लाऊज आणि लाल साडीमध्ये माधुरी सुंदर दिसत आहे. या साडीची किंमत 24 हजार असून ही साडी क्षितीज जलोरी या डिझाईनरने डिझाईन केली आहे.माधुरी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील व्हिडीओ शेअर करत असते.माधुरी ‘डान्स दिवाने-3’ या शो मधुन प्रेक्षकांच्या भेटीस येते.माधुरी नेटफ्लिक्सवरील ‘फाइंडिंग अनामिका’ या मालिकेमधून डिजिटल प्लॅटफोर्मवर पदार्पण करणार आहे.