सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) काळात लॉकडाउन (Lockdown) असल्याने अनेक गरजू नागरिकांची हाल होताना दिसत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन रोटरी क्‍लब ऑफ सातारा (Rotary Club of Satara) 7 हिल्सने गरजू लोकांसाठी मोफत अन्न सेवा जिल्हा रुग्णालय (District Hospital) येथे सुरू केली आहे. रोटरीच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक नागरिकांना जेवण मिळू लागले आहे. या उपक्रमात प्रकल्पाचे प्रमुख गौरव वखारिया, आदित्य आहेरराव, निरंजन फडणीस, समीर पंडितराव, स्मिता बेंद्रे, अनुराधा पंडितराव, कोमल बनवट, प्रसन्न बनवट, संदीप कोठावळे, अजित करडे, केतन टंकसाळे, डॉ. तनया टंकसाळे व रोटरीचे सदस्य सहभागी होत आहेत. (Distribution Of Food Grains To Poor Citizens In Satara Koregaon Satara Marathi News)

कोरोना काळात लॉकडाउन असल्याने अनेक गरजू नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत.

कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे जेवणाची हॉटेल व इतर सर्वच दुकाने बंद आहेत. या परिस्थितीत कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व इतर गरजू व्यक्तींसाठी जिल्हा रुग्णालयात दुपारी बारा वाजता व सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी फूड पॅकेटचे वाटप केले जात असून, 100 ते 150 नागरिकांना लाभ घेत आहेत. याचबरोबर शहरात विविध ठिकाणी गस्तीवर असणारे पोलिस Police, होमगार्ड कर्मचाऱ्यांना फूड पाकीट पोच केले जात आहेत. याचबरोबर, पाटण-कोयनानगर येथील दुर्गम भागात चार ऑक्‍सिजन सिलिंडर देण्यात आली आहेत, तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, आशा वर्कर यांना सॅनिटायझर, हॅंडवॉश, मास्क, औषधे, किराणा किट आदी वस्तूंचे मदत केली जाते.

Also Read: हॉटेल्स, रेस्टॉरंट, सलूनसह साता-यात दुकाने उद्यापासून अनलाॅक

corona

कोरेगावात झोपडपट्टीत खिचडी, भातवाटप

कोरेगाव : लॉकडाउनची झळ बसून आपल्या हातावर पोट असलेल्या मजूर आणि गोरगरीब कुटुंबांना रात्री उपाशीपोटी राहावे लागू नये, या पार्श्वभूमीवर येथे काल कमलनयन बचत गट संचलित शिवभोजन केंद्राच्या वतीने 170 लाभार्थींना संध्याकाळचे जेवण म्हणून खिचडी व भाताचे वाटप करण्यात आले. शासन निर्णयानुसार मजूर, गरीब व गरजू लोकांना शिवभोजन केंद्रांतर्फे सकाळचे एक वेळ मोफत जेवण देण्यात येते. परंतु, कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आणि लॉकडाउनमुळे केवळ हातावर पोट असलेल्या लोकांना रोजगार नसल्याने रात्री उपाशीपोटी झोपावे लागते आहे. म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सूचनेनुसार गरीब व गरजू मजुरांना शिवभोजन केंद्रांच्या वतीने लोकसहभागातून संध्याकाळचे जेवण द्यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Also Read: चर्चाच चर्चा! पोलिस पाटलाच्या लग्नापुर्वीच्या कृतीचे चर्चा

कमलनयन शिवभोजन केंद्रातर्फे काल पहिल्या दिवशी लोकसहभागातून लक्ष्मीनगर परिसरातील झोपडपट्टीत घरोघरी जाऊन संध्याकाळचे जेवण म्हणून खिचडी आणि भाताचे वाटप करण्यात आले तसेच केंद्रावर सकाळी जेवण वाटप सुरू करण्यात आले. कोरेगाव व रहिमतपूर येथील दानशूर व्यक्ती, व्यापारी वर्गाने या उपक्रमात सहभागी होऊन गरीब व गरजू लोकांना संध्याकाळचे जेवण देण्यासाठी रोख स्वरूपात मदत न करता तांदूळ, गहू, तेल डबा, रवा इत्यादी स्वरूपामधे कमलनयन शिवभोजन केंद्र कोरेगाव, हॉटेल शिवराज शिवभोजन केंद्र अथवा तहसीलदार कार्यालय पुरवठा शाखा येथे मदत करावी, असे आवाहन तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, पुरवठा अधिकारी सुनील बोतालजी यांनी केले आहे.

Also Read: “कोव्हॅक्‍सिन’ लस आली रे! दूस-या डाेससाठी नागरिक केंद्रावर

तनिष्का गटाकडून मदतीचा श्रीगणेशा

कोरेगाव येथे पल्लवी महामुनी संचलित कमलनयन शिवभोजन केंद्राच्या वतीने लोकसहभागातून जेवण वाटप करण्यात येणार असल्याचे समजताच येथील तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख वंदना शिंदे यांनी तातडीने महामुनी यांच्याकडे तेल डबा आणि मूगडाळ सुपूर्द करून मदतीचा श्रीगणेशा केला.

Distribution Of Food Grains To Poor Citizens In Satara Koregaon Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here