सातारा : सातारा पालिकेत (Satara Municipality) समाविष्ट झालेल्या शाहूपुरीतील ओढे-नाले सफाई रेंगाळल्याचा फटका अनेकांना बसला असून पहिल्याच पावसात डोंगर उतारावरून आलेले पावसाचे (Rain) पाणी घरांत घुसल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शाहूपुरीतील नागरिकांनी केला आहे. (Loss Of Civilians Due To Encroachment In Shahupuri At Satara)

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओढ्या-नाल्यांची सफाई व्हायची. मात्र, सध्या येथील कारभार पालिका प्रशासकाच्या मदतीने सुरू आहे.

पेढ्याच्या भैरोबाच्या डोंगरउतारावरून आलेले अनेक ओढे-नाले शाहूपुरी परिसरात आहेत. या ओढ्या-नाल्यांलगत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहेत. या वसाहती वाढत असतानाच त्या ओढ्या-नाल्यांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत, तर अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रवाहाची दिशा बदलण्यात आली आहे. नैसर्गिक ओढे-नाल्यांतील अतिक्रमणांचा फटका अनेकांना दरवर्षी बसतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओढ्या-नाल्यांची सफाई व्हायची. मात्र, सध्या येथील कारभार पालिका प्रशासकाच्या मदतीने सुरू आहे. प्रशासकीय कामांवर मर्यादा येत असल्याने नालेसफाई रखडली. फोटोबाजीसाठी झालेल्या या ओढे-नाले सफाईवर त्यावेळी नागरिकांनी आक्षेप घेतला होता.

Also Read: ‘कुटुंबांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू’

याचअनुषंगाने त्यासाठीचे निवेदन चैतन्य कॉलनी, आदर्श कॉलनी, शिवाजीनगर, सारडा कॉलनी, सोमेश्‍वर कॉलनी व इतर भागातील नागरिकांनी पालिकेस दिले होते. त्यासाठीचा पाठपुरावा देखील शाहूपुरी ग्रामविकास आघाडीने केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका ओढ्याकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांना बसला. काल (ता. 5) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी डोंगरउतारावरून येऊन अनेकांच्या घरांत घुसले. या पाण्याबरोबरच कचरा व इतर घाणही घरांत आल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. पावसाचे पाणी घुसल्याचा सर्वाधिक फटका यशवंत माने यांना बसला. पाण्याबरोबरच इतर घाण त्यांच्या घराच्या आवारात घुसल्याने त्यांना रात्र जागूनच काढावी लागली.

Rain

कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

शाहूपुरी हद्दीतील ओढे-नाल्यांची सफाई फोटोसेशनपुरतीच झाली असून त्याचा फटका डोंगरउतारावरील अनेक घरांना बसत आहे. याबाबतचे निवेदन पालिकेस दिले होते. मात्र, त्यावर योग्य कार्यवाही झाली नसल्याने त्याविरोधात येत्या काही दिवसांत आम्ही आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया भारत भोसले यांनी दिली.

Loss Of Civilians Due To Encroachment In Shahupuri At Satara

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here