उंब्रज (सातारा) : केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस (Petrol, Diesel And Gas) दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेनुसार कऱ्हाड उत्तर कॉंग्रेसच्या (Congress Party) वतीने उंब्रज- मसूर मार्गावरील वडोली भिकेश्वर येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा (Central Government) या वेळी निषेध करण्यात आला. (Congress Party Agitation Against Petrol And Diesel Price Hike At Umbraj Satara Marathi News)
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती भरमसाट वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला आहे.
कॉंग्रेसचे कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या आंदोलनास प्रांतिक प्रतिनिधी अजितराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, विकास जाधव, प्रताप देशमुख, दुर्गेश मोहिते, मधुकर जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे, सज्जन यादव, अनिल मोहिते, किशोर गांधी, वसंतराव जाधव, यशवंत चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
Also Read: ‘लुटेरे मोदी सरकार, पेट्रोल हुए शंभरी पार’; खटाव-माण, फलटणात कॉंग्रेस आक्रमक

श्री. जाधव म्हणाले, “”केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर लोकांचे जगणे कठीण होईल.” अजित पाटील म्हणाले, “”केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रणीत युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवल्या. सामान्यांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली.” कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या वेळी महागाई व इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.
Congress Party Agitation Against Petrol And Diesel Price Hike At Umbraj Satara Marathi News
Esakal