ओरोस (सिंधुदूर्ग) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले असून त्यांच्या सोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरु केला आहे. नियोजित वेळेच्या 15 ते 20 मिनिटे अगोदर मुख्यमंत्री आढावा स्थळी दाखल झाल्याने अधिकारी वर्गाची चांगलीच धांदल उडाली आहे. 3.45 वाजता नियोजित वेळ असताना 3.20 ला मुख्यमंत्री दाखल झाले. या सभेला केवळ 85 अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अन्य अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यात पत्रकारांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाही. याबाबत कोकण आयुक्त शिवाजी दौड व जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची भेट घेवून जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांनी विचारणा केली. यावेळी दौड यांनी मुख्यमंत्री सचिवांशी याबाबत बोलणे सुरु आहे. परंतु त्यांच्याकडून याबाबत खात्रीशिर काहीही सांगितले जात नाही. प्रवेश देण्याचा निर्णय झाला तर आपण कळवतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गणपतीपुळ्यात… –
पासचा उपयोग काय ?
दरम्यान, ही मिनी कॅबिनेट नसुन केवळ आढावा बैठक असताना प्रवेश दिला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री दौऱ्याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने पत्रकारांना पास दिले आहेत. आढावा बैठकीत प्रवेश नाही. मुख्यमंत्री यांची नियोजित पत्रकार परिषद नाही, तर पासचा उपयोग काय ? असा प्रश्न पत्रकारांना पडला आहे.
हेही वाचा– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही भूमिका ऐकूण घेणार काय…? –
हॉटेल, दुकाने बंद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर जिल्हा मुख्यालयातील हॉटेल व अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने हॉटेल मालकांना दिले आहेत. दुपारी 3 वाजल्यापासून दुकाने बंद करावित असे आदेश देण्यात आले असून मंगळवारी सकाळी सुद्धा हॉटेल व अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही काळजी घेण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

News Story Feeds