धरणगाव : शहरात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) उद्यान पुनर्निर्माणाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजप (Bjp) कार्यकर्त्यांनी शहरातील पाणीप्रश्‍नी आणि ओबीसी आरक्षण मागणीसाठी पाणीपुरवठा (Water supply) मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांना काळे झेंडे दाखविले.

(minister gulabrao patil bjp workers show black flags)

Also Read: दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एकच रुग्णाचा मृत्यू !

शहरात गेल्या २० ते २२ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित असताना सत्ताधारी पाणीपुरवठा मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मशगुल आहेत. गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास भाजप तीव्र आंदोलन (BJP Movement) छेडेल, असा संतप्त इशारा भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील आणि शहरध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिला आहे.

Also Read: गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करा !

यावेळी अॅड. संजय महाजन म्हणाले, की राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत न झाल्यास आता भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अॅड. संजय महाजन यांच्यासह तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन आणि सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या वेळी भाजप सेना कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here