बॉलिवूडमधील 70 व्या शतकातील ग्लॅमरस अभिनेत्री डिंपल कपाडियाने 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. कमी वयामध्ये डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. 1973मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटामधून डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर डिंपल यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्यामध्ये 15 वर्षांचा फरक होता. त्यावेळी या दोघांच्या लव्ह स्टोरीची चर्चा होती. 11 वर्षे सोबत राहिल्यानंतर त्या दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. रुदाली,जाबांज,सागर या सुपर हिट चित्रपटांमधून डिंपल प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या.15 जानेवारी 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजमधून डिंपल यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. डिंपल यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.