मॉन्सूनचे आगमन झाले आहेत. आतापर्यंत मॉन्सूनने (Monsoon) अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत मान्सून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महिनाभर जाणवणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या काही शहरांना मॉन्सूनमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. (Beauty Tips to Keep Your Skin Glowing this Monsoon)

प्रत्येक ऋतू स्वत:बरोबर वेगवेगळ्या समस्याही घेऊन येतो असतो. पण पावसाळा ऋतूमध्ये तुम्हाला त्वचेची जास्त काळजी घ्यावे लागते. पावसाळ्यात तुमची त्वचा पॅची दिसू शकते आणि चेहऱ्यावर मुरम आणि पुरळ होण्याची शक्यता असते, पण काळजी करु नका. यंदा पावसाळ्यात चेहऱ्यावर तजेलदारपणा टिकविण्यासाठी दररोज आपल्या त्वचेची देखभाल करताना या टीप्स ट्राय करा.

मॉन्सूनमध्ये सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा ब्युटी टिप्स

सनस्क्रिन लावायला विसरू नका

पावसाळ्यात सनस्क्रिन लावण्याची काही गरजचे नाही असे एखाद्याला वाटू शकते पण हे सत्य नाही. ढगाळ वातावरण असले म्हणजे तुमची त्वचा उन्हापासून(सुर्य किरणांपासून) सुरक्षित आहे असे समजू नका. त्यामुळे दररोज नियमितपणे सनस्क्रिन लावणे त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.

सनस्क्रिन लावायला विसरू नका

एक्सफोलिएट, क्लिन्ज, टोन आणि मॉइस्चर

तुम्ही जर ब्युटी टीप्स फॉलो करत असाल तर तुम्हाला या 4 स्टेप्स माहित असून शकता. तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला सर्वात आधी तुमचा त्वचा एक्सफोलिएट म्हणजे स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर क्लिन्जर वापरून कॉटने चेहरा पुसून घ्या. चेहऱ्यांवर आधी टोनर लावा त्यानंतर 10 मिनिटांनी मॉइश्चरायझर लावा.

एक्सफोलिएट, क्लिन्ज, टोन आणि मॉइस्चर

पाणी पीत राहा

तुम्ही ऐकले असेल की कोणत्याही त्वचेसंबधित आजारावर पाणी हे सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे पावसाळ्यात या औषधाचा आवर्जून वापर करा. दररोज दिवसभरात 2 लीटर पाणी प्या जेणेकरुन तुमचा चेहऱ्यावर मुरम किवा पुरळ येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विषारी पदार्थापासून मुक्त राहाल.

पाणी पीत राहा

घरगूती उपाय ट्राय करा

बाजारातील कॉस्मेटिक प्रॉडक्टऐवजी घरगुती उपायांचा पर्याय निवडा. तुम्ह स्वत: घरगूती स्क्रब, क्लिन्झर आणि टोनर बनवू शकता. तसेच तुम्ही मुलतानी मिट्टीचा वापर करुन घरच्या घरी फेसपॅक बनवू शकता.

घरगूती उपाय ट्राय करा

मेकअपचा वापर कमी करा

मान्सूनमध्ये मेकअप केल्यास पावसात धुवून जाऊ शकतो त्यामुळे चेहऱ्यावर मेकअप न वापरणेच चांगले. तरीही तुम्हाला मेकअप करायचा असेल तर वॉटरप्रुफ मेकअप करु शकता. पावासळ्या तुमची त्वचा पॅची दिसू शकते त्यामुळे मेकअपचा शक्य तितका कमीतकमी वापर करा.

मेकअपचा वापर कमी करा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here