विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. 13 जूलैला वनडे सामन्याने भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 25 जुलैलाल टी-20 सामन्याने दौऱ्याची सांगता होईल. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना दुसऱ्या बाजूला वनडेसाठी त्यांच्या अनुपस्थिीत वेगळा संघ मर्यादित सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Team-India Sri Lanka Tour Coach Rahul Dravid Captain Shikhar Dhawan Or Shreyas Iyer)

भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड संघाला मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. अनुभवी शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पण आता यात आणखी ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण श्रेयस अय्यर फिट असून जर तो श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध झाला तर धवन आणि अय्यर यांच्यात कॅप्टन्सीसाठी सामना रंगल्याचे पाहायला मिळू शकते. ज्या खेळाडूंचा श्रीलंका दौऱ्यावर समावेश होण्याची शक्यता आहे, त्यांनी देखील धवनच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे धवनच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. जे खेळाडू इंग्लंड दौऱ्याचा भाग नाहीत आणि ज्यांनी गेल्या काही सामन्यात लक्षवेधी कामगिरी केलीय त्यांना श्रीलंका दौऱ्यावर संधी निश्चित मिळेल. यात युवा खेळाडूंचा अधिक भरणा दिसू शकतो.

Also Read: वर्णभेदाच्या प्रकरणात आणखी एक इंग्लिश प्लेयर अडचणीत

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला. मायदेशी परतल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले. विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीने विक्रमी खेळी साकारली. आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने विशेष छाप सोडली त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर त्याला संघात स्थान मिळू शकते. सुर्यकुमार यादवने मायदेशात इंग्लंड विरुद्ध दमदार पदार्पण केले होते. त्याचीही निवड पक्की मानली जात आहे. या दोघांशिवाय देवदत्त पदिक्कल हा ही संघाचा भाग असेल.

Also Read: मित्रा ह्रदय तुटते! अश्विनने घेतली मांजरेकरांची फिरकी

असा असेल भारताचा संभाव्य संघ

पृथ्वी शॉ, देवदत्त पदिक्कल, शिखर धवन, सुर्यकुमार यादव, ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, राहुल चाहर, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

असा आहे भारताचा श्रीलंका दौरा

13 जुलै 2021

16 जुलै 2021

18 जुलै 2021

टी-20 सामने

21 जुलै 2021

23 जुलै 2021

25 जुलै 2021

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here