1990 साली रिलीज झालेल्या ‘दिल’ (Dil) चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली. या चित्रपटातील आमिर खान (Aamir Khan) आणि माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) दमदार केमिस्ट्रीने लोकांना वेड लावलं. आजही हा चित्रपट आणि त्यातील गाणी यादगार आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला, पण आज आम्ही तुम्हाला असा एक ‘किस्सा’ सांगणार आहोत, जो चित्रपटाच्या शूटिंगशी निगडित आहे.
‘दिल’ या 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटाशिवाय माधुरी दीक्षित आणि आमिर खाननं आणखी 2 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. ज्यात दीवाना मुझ सा नहीं आणि बॉम्बे टॉकीजचा समावेश आहे. या जोडीचा ‘दिल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, परंतु ‘दीवाना मुझ सा नहीं’ने स्क्रीनवर चांगली कामगिरी केली. या दोघांव्यतिरिक्त खुशबू, सत्येंद्र कपूर, बीना बॅनर्जी, दिनेश हिंगू या कलाकारांनी देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या.
आमिरने एका ‘शो’ दरम्यान हा किस्सा उघडकीस आणला. त्याने हात पाहण्याच्या बहाण्याने माधुरीशी मस्करी केली होती. सेटवर या घटनेविषयी बोलताना आमिर म्हणाला, ‘माधुरी माझ्यावर खूप रागावली होती, कारण मी सेटवर तिचा हात पाहण्याचं नाटक केलं होतं.’ याचवेळी आमिरनं माधुरीला सांगितलं, की तू खूप भोळी, भावनिक आहेस आणि लोक या तुझ्या भोळेपणाचा जास्त फायदा घेतात, जसा की मी आता घेत आहे, असं म्हणत आमिरनं माधुरीच्या हातावर थुंकलं होतं.
आमिरच्या या मस्करीवर माधुरी खूपच चिडली आणि तिनं आमिरला मारण्यासाठी हॉकी स्टिकचा वापर करत त्याचा पाठलाग केला होता. ट्विटरवर देखील माधुरीनं तिच्या चाहत्यांशी संवाद साधताना हा किस्सा शेअर केला होता. ती सांगते, ‘दिल’ चित्रपटाच्या सेट्सवर मी आमिरवर खूप भडकले होते आणि त्याला मारण्यासाठी हातात हॉकी घेऊन पाठलाग करत होते, असं तिनं सांगितलंय.
2016 मध्ये जेव्हा एका चाहत्यानं माधुरीला ट्विटरवर विचारले, की तिनं आत्तापर्यंत सर्वात जास्त खोड्या कधी केल्या? यावर माधुरीनं उत्तर देताना ‘दिल’ चित्रपटाविषयी सांगितलं. ‘दिल’च्या शूटिंगदरम्यान मी हॉकी घेऊन आमिरचा पाठलाग केला होता, कारण त्यानं माझी खिल्ली उडविली होती. त्यामुळे हा किस्सा माझ्यासाठी महत्वाचा असल्याचं तिनं सांगितलं होतं.
90 च्या दशकात या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप आवडली होती. मात्र, तीन चित्रपटानंतर हे दोघे कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. असे क्वचितच प्रसंग असतील, जेव्हा हे दोघे एकत्र दिसतात. सध्या आमिर त्याचा आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’च्या तयारी आहे, ज्यात तो सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे, तर धक्-धक् गर्ल माधुरी दीक्षित सध्या कलर्सच्या डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here