सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte). अरुंधतीने घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर ही मालिका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. त्यातच अरुंधतीपासून वेगळं होण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या अनिरुद्धने ऐनवेळी यु-टर्न घेतला आहे. अलिकडेच झालेल्या भागत अनिरुद्धने संजनासोबत लग्न न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोबतच त्याला अरुंधतीपासून वेगळं व्हायचं नाही हेदेखील सांगितलं आहे. त्यामुळे सध्या देशमुख कुटुंबासमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. परंतु, अरुंधती तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहे. विशेष म्हणजे अनिरुद्ध-अरुंधती आणि संजना यांचा वाद सुरु असतांनाच अभिषेक आणि अंकिता यांच्यामध्येही खटके उडू लागले आहेत. (aai-kuthe-kay-karte-new-twist-abhishek-gave-a-warning-to-ankita)

अनिरुद्धने संजनासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिषेकनेदेखील अंकिताला तिच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेकसोबत लग्न करता यावं यासाठी अंकिताने आत्महत्येचं नाटक रचून देशमुख कुटुंबात प्रवेश मिळवला. मात्र, तिचं असं वागणं घरातील एकाही सदस्याला पटलेलं नाही. तसंच देशमुख कुटुंबात आलेल्या अंकिताचा मनसुबादेखील काही चांगला नसल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधतीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अंकिता नवनवे डाव रचतांना दिसून येत आहे. त्यामुळेच आता अभिषेकने तिला सक्त ताकीद दिली आहे.
Also Read: ‘लेडी बाहुबली’ची कमाल! सिलेंडर- बादल्या घेऊन करते वर्कआऊट
दरम्यान, अंकिताचा खोटारडेपणा उघड झाला तर तिला देशमुख कुटुंबातून बाहेर जावं लागेल अशी सक्त ताकीद अभिषेकने तिला दिली आहे. त्यामुळे येत्या काळात या मालिकेत कोणत्या घटना घडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Esakal