बुडापेस्ट: सध्या युरोपमधील हंगेरी या देशात चीन विरोधात लोक रस्त्यावर आलेली दिसत आहे. हंगेरीत चीनच्या फुदान विद्यापीठाच्या स्थापनेला स्थानिक मोठा विरोध करत आहेत. हंगेरीच्या नागरिकांनी आरोप केला आहे की, चीनच्या दबावाला बळी पडून हंगेरियन सरकारने विद्यापीठाच्या स्थापनेला परवानगी दिली होती. तसेच चीनेचे फुदान विद्यापीठ भारतात स्थापन झाले तर हंगेरीत साम्यवादी विचारधारा वाढेल आणि देशात साम्यवादी वरचढ ठरू लागतील, असा दावाही आंदोलकांनी केला आहे.
युरोपातून एका महिन्यात चीनला बसलेला हा दुसरा धक्का आहे. यामुळे चीनच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता दिसत आहे. यापुर्वी लिथुआनियात चीनचा प्रभाव असलेल्या १७+१ संघटनेतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. लिथुआनिया इथेच न थांबता त्या देशाने इतर देशांनाही या संघटनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. ‘चीन युरोपात फूट पाडण्याची रणनिती वापरत आहे, असा आरोपही लिथुआनियाने केला होता.

काही दिवसांपुर्वी हंगेरीच्या सरकारने राजधानी बुडापेस्टमध्ये चीनच्या फुदान विद्यापीठाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. याचे कामही सुरू झाले होते. पंतप्रधान व्हिक्टर ओरबॅन यांनी या विद्यापीठामुळे हंगेरीचा शिक्षणाचा दर्जा सुधारेल असं सांगितलं होतं. पंतप्रधान व्हिक्टर यांना चीनच्या जवळील मानले जाते. सुरुवातीला या प्रकल्पाला हंगेरीत काही प्रमाणात विरोध झाला होता नंतर आता याचे लोन हंगेरीत देशभर पसरले आहेत. सध्या हजारो लोक चीनच्या फुदान विद्यापीठाच्या विरोधात हंगेरीत आंदोलन करत आहेत.
Also Read: PHOTO : जपानची ‘ही’ सरोवरे म्हणजे स्वर्गसुखच जणू! एकदा पाहाच
एप्रिल महिन्यात हंगेरीतील सरकारने बुडापेस्टमध्ये फुदान विद्यापीठाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. मंजुरी मिळाल्यानंतर लगेच कॅम्पसचे कामही सुरू झाले होते. त्यामुळे याचे नियोजन चीनने अगोदरच करून ठेवले होते असा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर हंगेरी सरकारने सागितले आहे की, हा विरोधकांचा एक स्टंट आहे. हे विद्यापीठ देशात स्थापन झाल्यावर हंगेरीतील शिक्षणाचा दर्जा वाढेल अशी आशाही व्हिक्टर सरकारने व्यक्त केली आहे.
Esakal