खटाव (सातारा) : खटाव तालुक्यातील बळीराजाची (Farmers) उन्हाळी भुईमूग (Groundnut) काढण्यासाठी लगबग सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) कित्येक दिवसांपासून रोजगारी लोकांच्या हाताला काम नसल्याने भुईमूग काढणीच्या कामांमुळे मजुरांनाही रोजगार मिळत असल्याने त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. अवघ्या चार महिन्यांत या पिकापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. शेंगाला भाव चांगला आहे, तसेच गुरांसाठी भुईमूगाचे वेल जनावरांसाठी पौष्ठिक चारा ठरत असल्याने हे पीक वरदान ठरत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. (Satara Agro News Khatav Farmers Gets Good Price Groundnuts Employment)

खटाव तालुक्यातील बळीराजाची उन्हाळी भुईमूग काढण्यासाठी लगबग सुरू आहे.

अलिकडच्या काही वर्षात तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात पाण्याची स्थिती समाधानकारक असल्याने येथील शेतकरी आता आले, कांदा, ऊस, बटाटा, हळद आदी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला आहे. यावर्षी परतीचा पाऊस (Rain) समाधानकारक झाला व भुईमूगाला वातावरणही पोषक असल्याने उताराही चांगला मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस भूईमूग काढणीला सुरुवात होते व जूनच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत रानं मोकळी होतात. त्यामुळे या भागात मान्सूनचे (Monsoon) आगमनही तुलनेने उशिरा होत असल्याने हे पीक फायदेशीर ठरत आहे.

Also Read: कृषी केंद्र, बॅंक बंदीचा शेतकऱ्यांना फटका; खरिपातील बियाणे खरेदीवर परिणाम!

Farmers

अलिकडच्या काळात जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभाग यातून गावशिवारात जलसंधारणाची विविध कामे घडली. त्याद्वारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. सिंचनाची आधुनिक पध्दत उपलब्ध झाल्याने पीकपध्दत बदलत आहे. रब्बी क्षेत्रात वाढ होऊ लागली. शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागल्याचे दिसत आहे. उन्हाळी भुईमूगाचे उत्पन्न खरीप हंगामापेक्षा जास्त निघते. यातून मोठा फायदा होतो व शेंगालाही मोठी मागणी असते. शिवाय हे पीक काढताना मजुराची अडचण येत नाही. मजूर लगेच उपलब्ध होतात. एकरी दहा हजार रुपये सरासरी खर्च येत असला, तरी शेंगाला दर असल्याने चांगले पैसे मिळतात, असे विसापूर येथील शेतकरी प्रल्हाद जिजाबा कदम सांगतात.

Satara Agro News Khatav Farmers Gets Good Price Groundnuts Employment

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here