जळगाव ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Government Medical College and Hospital jalgaon) आज कोरोना सदृश व म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) आजाराने गंभीर असलेल्या परप्रांतीय प्रौढावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Surgery) यशस्वीपणे झाली आहे. रुग्णालयात म्युकोरमायकोसिस आजाराच्या रुग्णावरील हि चौथी शस्त्रक्रिया होती. या रुग्णाला राज्याबाहेरील रहिवासी असल्याने व मोफत उपचारासाठी राज्याच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने शर्थीचे प्रयत्न करीत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा (Prime Minister’s Public Health Scheme) लाभ मिळवून देण्यात रुग्णालय प्रशासनाला यश मिळाले.
(jalgaon covid hospital fourth mucormycosis surgery)

Also Read: नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा होणार अधिक सक्षम

अत्यंत गुंतागुंतीची आणि साडेचार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत रुग्णाचा जीव वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. बडवानी (धवळी, मध्यप्रदेश) येथील पन्नास वर्षीय व्यक्ती ३० मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना कोरोना सदृश, म्युकोरमायकोसिस आजाराची देखील लागण झाली होती. म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले. त्यानंतर आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ.आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक सी २ मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी ८ विभागातील प्रत्येकी दोन डॉक्टरांची मिळून शस्त्रक्रियेसाठी १९ जणांची टीम बनवली. आज सकाळी साडेनऊला रुग्णाची शस्त्रक्रिया झाली.

या अवयवांवर झाली शस्त्रक्रिया…
शस्त्रक्रियेत या रुग्णाच्या वरचा दोन्ही बाजूच्या जबडा, टाळू, वरचे दातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच हि शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. रुग्णास द्रवपदार्थद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पाडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली.

Also Read: ग्रामस्‍थांनी रात्र काढली जागून..ढगफूटीसारखा पाऊस

कोरोना सदृश आजार व त्यात म्युकोरमायकोसिस झाल्यामुळे रुग्णाचा परिवार चिंतीत झाला होता. त्यांना धीर देत, संबंधित रुग्णाचा शस्त्रक्रियेद्वारे जीव वाचविला आहे. हा रुग्ण परराज्यातला होता. त्याला आपल्या रुग्णालयाकडून मोठ्या आशा होत्या. शक्य ते सर्व प्रयत्न आपण केले आहे.

-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here