अकोला ः पेरणीच्या तोंडावर बियाणे खरेदीची लगबग सुरू असताना बियाणे विक्रेत्यांनी महाबीजसोबत इतर कंपनीचे महागडे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे हवे असेल तर इतर कंपनीचे बियाणे खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या तेल्हारा येथील कृषी सेवा केंद्र संचालकाविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. (Seed Linking at Agricultural Center at Telhara)

Also Read: मेहकर कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?

तेल्हारा तालुक्यात सोयाबीन बियाणे खरेदी करताना देयकावर शिक्का मारून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याच्या वृत्ताची शाही वाळत नाही तोच बियाणे साखळी करून महागडे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. ऐन पेरणीचे दिवसात शेतकऱ्यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे लागल्यास इतर बियाणे घेतल्या शिवाय महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळणार नाही, असा आग्रह धरत आहे. याबाबतची माहिती कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून तेल्हारा येथील दधिमथी कृषी सेवा केंद्रावर धाड टाकून कारवाई केली.

Also Read: नक्षत्रावरून कसा पडतो पाऊस? मृग, मेंढा, उंदीर, म्हैस या नावांची गंमत तरी काय?

सोयाबीन

Also Read: अकोला जिल्‍ह्यातील ७७ गावे असुरक्षित; पुराचा धाेका कायम

सोयाबीनसोबत कपाशी बियाण्याची सक्ती
दधिमथी कृषी सेवा केंद्रावर आकोली रुपराव येथिल शेतकरी गौरव लासुरकार या शेतकऱ्याने महाबीजचे सोयाबीन बियाणे मागितली असता सदर बियाणे सोबत कपाशी बियाणे घ्यावे लागणार, असा आग्रह धरला. कृषी सेवा केंद्र मालकाने शेतकऱ्यांची अशा प्रकारे लुट चालविली असल्याची माहिती तालुका भरारी पथक यांना मिळताच सदर कृषी सेवा केंद्रावर धाड टाकून प्रत्यक्षदर्शी पंचनामा करून अहवाल परवाना अधिकारी यांचेकडे पाठविला आहे. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, मंडळ अधिकारी नरेंद्र राठोड, उमेश कदम यांनी केली.

१ जूनपूर्वी बियाणे विक्रीची कारवाई
कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने कपळीच्या धुळ पेरणीवर प्रतिबंध लादण्यात आला होता. त्यामुळे १ जून पूर्वी कपाशी बियाणे विक्रीस मनाई असताना तेल्हारा येथील कृषी सेवा केंद्राकडून कपाशी बियाणे विक्री करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांनी तेल्हारा येथे भेट देवून माहिती घेतली होती. योगायोग म्हणजे दधिमथी याच कृषी सेवा केंद्रावर हा प्रकार घडला होता. त्यासाठी कृषी विभागाने कृषी सेवा केंद्र संचालकांना नोटीस पाठविली असल्याची माहिती आहे.

संपादन – विवेक मेतकर

Seed Linking at Agricultural Center at Telhara

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here