मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपसाठी (WTC 2021) इंग्लंडमध्ये गेला आहे. पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका देखील विराटसोबत आहेत. विराट आणि त्याच्या आरसीबीमधील एबी डीव्हिलियर्स यांच्यामधील मैत्री सर्वांनाच माहित आहे. अनुष्का आणि एबी डीव्हिलियर्स पत्नी डॅनियल या दोघींनाही सामन्या दरम्यान एकत्र पाहिले गेले आहे. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डॅनियलने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनुष्का आणि वामिकासोबतचा फोटो डॅनियल डीव्हिलियर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्टाग्रामवरील ASK ME ANYTHING या सेशनमध्ये डॅनियलला एका चाहत्याने विचारले होते की, ‘तुम्ही आणि अनुष्का शर्मा एकमेकिंसोबत वेळ घलवता का?’ या प्रश्नाला उत्तर देत डॅनियलने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला डॅनियल कॅप्शन दिले, ‘अनुष्काचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. आम्ही एका देशात राहात नाही. आम्ही जर एकत्र राहात असतो तर… हा विचार करून मला चांगले वाटते.’ डॅनियल शेअर केलेल्या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही.

Also Read: वयाच्या ४६व्या वर्षी फिटनेस, सौंदर्याने भुरळ पाडणारी शिल्पा शेट्टी
विराट आणि अनुष्काने वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपुर्वी मुंबई विमानतळावर अनुष्का आणि वामिका पापाराझीने घेरले. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सने वामिकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अनुष्का त्यांच्यावर भडकली होती. 11 जानेवारी 2021रोजी वामिकाचा जन्म झाला. त्यानंतर विराट आणि अनुष्काने वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हील न करण्याचा निर्णय घेतला.
Also Read: ‘लार्जर दॅन लाइफ’ संकल्पनेला छेद देणारा यामीचा पारंपरिक विवाहसोहळा कसा होता?
Esakal