मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. विद्या तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत करते. नुकतेच विद्याने इन्टाग्रामवरील ‘ask me anything’ या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये विद्याने तिचा आवडता चित्रपट, गाणी, खाद्य पदार्थ या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली. एका चाहत्याने विद्याला ‘शाहरूख आवडतो की सलमान?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला विद्याने भन्नाट उत्तर दिले.(vidya balan pic between shah rukh khan and salman khan)

विद्याला एका चाहत्याने ‘शाहरूख आवडतो का सलमान?’, असा प्रश्न विचारला त्यावर विद्याने उत्तर दिले, ‘सिद्धार्थ रॉय कपूर (My SRK)’ विद्याने यावेळी तिच्या पतीसोबतचा फोटो देखील शेअर केला. एका चाहत्याने विद्याला तिच्या आवडत्या चित्रपटाबद्दल विचारले. विद्याने त्याला उत्तर दिले, ‘गोलमाल’. विद्या फूडी आहे हे तिच्या चाहत्यांना माहित आहे. त्यामुळे एका यूजरने तिला प्रश्न विचारला, ‘तुझा आवडता पदार्थ कोणता?’ या प्रश्नाला तिने उत्तर दिले,’माझ्या सासूने तयार केलेली ब्रेड पुडिंग’.विद्याला एका नेटकऱ्याने ‘आवडता अभिनेता कोणता?’ असा प्रश्न विचाराला होता. त्यावर तिने ‘अमिताभ बच्चन’ असे उत्तर देत ‘पा’ या चित्रपटामधील तिचा आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला.असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विद्याला विचारले.

Also Read: ‘लार्जर दॅन लाइफ’ संकल्पनेला छेद देणारा यामीचा पारंपरिक विवाहसोहळा कसा होता?

विद्याचा ‘शेरनी’ हा 18 जूनला ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसूरकर यांनी केले आहे. विद्यासोबतच शरत सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज कबी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. विद्या या चित्रपटामध्ये वनरक्षक अधिकारीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. विद्याने एका मुलाखतीमध्ये या चित्रपटामधील तिच्या भूमिके विषयी सांगितले,’शेरनीची कथा पहिल्यांदा ऐकली, तेव्हापासूनच माझ्या मनात त्याविषयी फार उत्सुकतेची भावना निर्माण झाली. माझ्या भूमिकेला फार संवाद नाहीत, पण ती तिच्या नजरेतूनच खूप काही सांगून जाते. एका संवेदनशील विषयावर आधारित हा चित्रपट आहे. केवळ मनुष्य आणि प्राणी यांच्यातीलच नव्हे तर माणसांमध्ये एकमेकांविषयी असलेला आदर, परस्पर समन्वय, सहअस्तित्व या विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो.’

Also Read: ‘आवाज खाली, शिस्तीत बोलायचं’, रघु भडकला होता…

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here