मुंबई : सन 2020 मध्ये नोकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही अभूतपूर्व असे नोंदविण्यात आले आहे. कदाचित तुमचीही नोकरी या काळात गेली असेल. अथवा तुम्हालाही नवी नोकरी मिळवण्यात बऱ्याच खस्ता खाव्या लागत असतील. हे वास्तव असलं तरीही एका सर्वेक्षणात एक अशी माहिती पुढे आली आहे, जी वाचून तुम्ही देखील आपल्या करिअरबाबत आशावादी व्हाल. एका सर्वेक्षणानुसार, जवळपास 60 टक्के कंपन्या नव्या पदांसाठी टॅलेंटेड कर्मचारी घेण्याच्या विचारात आहेत. (Survey says 60 percent of the companies surveyed are looking to hire talent for new positions)

2021 मध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर्स हे कोरोनाच्या आधी जितके कर्मचारी घेत होते, तितकेच कर्मचारी पुन्हा एकदा घेण्याबाबत आता ते आशावादी असल्याचं दिसून येत आहे. सर्वेक्षण केल्या गेलेल्या जवळपास 60% कंपन्यांनी नवीन पदांसाठी टॅलेंटेड लोक घेण्याचा विचार करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्या या सकारात्माक दृष्टिकोनामुळे अधिक विश्वासार्हता प्राप्त झाली असल्याचे मर्सर मेटेलच्या (Mercer Mettl) अहवालात म्हटलं गेलंय. यासंदर्भात मर्सर मेटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ गुप्ता म्हणाले की, ” कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या 14 महिन्यांच्या काळात नव्या कर्मचाऱ्यांना घेण्याच्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक बदल झाला आहे. या अहवालामुळे इंडस्ट्री लीडर्सना 2021 आणि येणाऱ्या वर्षांमध्ये नोकरीवर नवे लोक घेण्यासाठी अभिनव पद्धतींचा विचार करण्यास उद्युक्त केलं जाईल.”

”The State of Talent Acquisition Report 2021′ नावाचा हा अहवाल शिक्षण सेवा, आर्थिक आणि व्यवसाय सेवा, आरोग्य आणि आतिथ्य, आयटी, इलेक्ट्रिकल, या आणि अशा अनेक क्षेत्रातील 500 कंपन्यांमधील C-suite अधिकारी आणि एचआर लीडर्सच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. मार्च आणि मे महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या अहवालातील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, व्हर्च्यूअल पद्धतीने भरती करण्यामध्ये चांगले भवितव्य आहे कारण सर्वेक्षण झालेल्यांपैकी जवळजवळ अर्धे लोक म्हणाले की त्यांनी या कोरोनाच्या काळात या पद्धतीचाच सर्वाधिक वापर केला आहे. या अहवालात नमूद केलंय की, सुमारे 81% कंपन्यांनी या कोरोना काळात नवे कर्मचारी घेण्यासाठी काही प्रमाणात व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्म निवडले.

ऑफलाइन पद्धतीतून ऑनलाइन पद्धतीकडे वळल्याचा या कंपन्यांना फायदाच झाला आहे कारण या व्हर्च्यूअल पद्धतीने कर्मचारी निवडणं तुलनेने सोपे आहे. त्याशिवाय जागतिक स्तरावरील उत्तम टॅलेंटपर्यंत पोहोचण्याचं हे एक सोपं आणि कमी खर्चिक साधन आहे, असं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की, या नवीन वातावरणात कंपन्या काही नवीन रोल्स देखील तयार करत आहेत. सुमारे 53% इंडस्ट्री लीडर्स हे उत्पादन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित पदासाठी उमेदवार घेण्याचा विचार करत आहेत, त्यानंतर ऑपरेशन (39.42%) आणि सेल्स रोल्स (39%) ही पदे आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here