जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा (corona) संसर्ग आटोक्यात येत असताना, आता रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची (patient) संख्या शंभराच्या टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. ७) १०२ रुग्ण समोर आले. मंगळवारी (ता. ८) १०९ नवे बाधित आढळले, तर ३२८ रुग्ण दिवसभरात बरे झाले व दोघांचा मृत्यू (death) झाला.
(jalgaon district corona patient daily numbers hundred)
Also Read: जिल्हा कोविड रुग्णालयात म्यूकोरमायकोसिसची चौथी शस्त्रक्रिया !
जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यांपासून रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. नवीन बाधितांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने सक्रिय रुग्णही घटले आहेत. मंगळवारी प्राप्त पाच हजार ३९६ चाचण्यांच्या अहवालात नव्या १०९ रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार १०३ वर पोचली, तर ३२८ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३५ हजार ९२९ झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १२, भुसावळ पाच, पाचोरा सहा, रावेर सहा, चाळीसगाव २०, एरंडोल ४९, अमळनेर, चोपडा, भडगाव, जामनेर, बोदवड या तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला, तर जळगाव ग्रामीण, पाचोरा, धरणगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
Also Read: शेतकऱ्याचा शेतात संशयास्पद मृत्यु; घातपात झाल्याचा परिवाराचा आरोप
लसीकरण थंडावले
जिल्ह्यातील विविध केंद्रांवर मंगळवारी लसींच्या साठ्याअभावी लसीकरण थंडावल्याचे चित्र होते. दिवसभरात जिल्ह्यातील केंद्रांवर १,६१८ जणांना पहिला डोस, तर ९०७ जणांना दुसरा डोस देण्यात आला.
Esakal