रत्नागिरी – गणपतीपुळे येथील शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर गुहागरचे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उघड-उघड आपली नाराजी व्यक्त केली. राजशिष्टाचारावरून जिल्हाधिकारी आणि नियोजनाच्या अधिकार्यांनाही त्यांनी सर्वांसमोर जाब विचारला. त्यामुळे मूळ कार्यक्रमापेक्षा संतप्त भास्कर जाधव यांच्या नाराजी नाट्याचीच चर्चा सुरू आहे.
हे पण वाचा – Sindudurg Special : सीएम साहेब, कोकण आपलाच आसा…
शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात व्यासपीठावर ते पहिल्या ऐवजी दुसर्या रांगेत गेले. उदय सामत यांनीही विनंती केली; मात्र त्यांच्यासाठी ठेवलेल्या पुढच्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत ते जाऊन बसले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सत्कारावेळी एका बाजूला असलेल्या जाधव यांना खासदार विनायक राऊत यांनी हात धरून आत घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खासदारांचा हात झटकून ते बाजूला झाले. त्यामुळे जाधव यांचे काय बिनसले, यावर एकच चर्चा गणपतीपुळेतील शिवसेनेच्या जाहीर मेळाव्या दरम्यान आणि नंतर रंगली.
हे पण वाचा – Photo Sindudurg Special : मुख्यमंत्री सिंधुदूर्गात येतच आहात तर जरा इकड लक्ष द्या….
गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकास कामांच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर मुख्यमंत्री गणपतीपुळे येथील आठवडाबाजाराच्या ठिकाणी भरविण्यात आलेल्या मेळाव्याला आले. व्यासपीठावर आल्यानंतर त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. मेळाव्याला गर्दीही प्रचंड होती. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु ठाकरे व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर त्यांच्या बाजूच्या खुर्च्यांमध्ये नावाप्रमाणे मान्यवर बसत होते. मात्र माजी मंत्री भास्कर जाधव व्यासपीठावर आले. परंतु ते मागच्या रांगेतून त्यांना दिलेल्या पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीकडे रवाना झाले. त्यावेळी राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना बसवण्यासाठी उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बोलावले होते. त्यांनाही हात दाखवत पुढच्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत जाऊन विसावले. एकुण कार्यक्रम संपेपर्यंत त्यांच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. राजशिष्टाचाराबाबत (प्रोटोकॉल) महसुलच्या अधिकार्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. माजी कॅबिनेट मंत्री आणि माजी पालकमंत्री असताना त्यांना पहिल्या रांगेतील शेवटची खुर्ची दिली गेली. यावरून भास्कर जाधव यांच्या चेहर्यावर उघड-उघड संताप दिसत होता. त्यांनी त्यानंतर जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याशीही चर्चा केली.
हे पण वाचा – सावधान : सावंतवाडीत सापडले माकडतापसदृश तीन रुग्ण….
भास्कर जाधव अलिप्त
मेळाव्याला उशीर झाल्यामुळे सत्कार-समारंभाचा कार्यक्रम मागे ठेवला होता. काही वक्ते बोलल्यानंतर मध्येच उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार घेण्यात आला. यावेळी देखील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर ऐकत्र आले. मात्र भास्कर जाधव अलिप्त होते. खासदार विनायक राऊत यांच्या हे लक्षात आले. त्यांनी भास्कर जाधव यांचा हात धरून त्यांना सत्काराच्या कार्यक्रमात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भास्कर जाधवांचा राग अनावर झाला होता. त्यांनी त्यांचा हात झटकून दिला आणि बाजूला जाऊन थांबले. शिवसेनेच्या मेळाव्यात आणि पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर हा सर्व प्रकार घडत होता. त्यामुळे भास्कर जाधव यांचे नेमके काय बिनसले हा विषय चर्चेचा ठरत होता.

News Story Feeds