बारामती – लॉकडाऊनमुळे (Lockdown) हातावर पोट असलेल्यांचे कमालीचे हाल झाले. खर्च (Expenditure) सुरु पण उत्पन्न बंद (Income Close) या मुळे अनेकांना कमालीचा मनस्ताप झाला, ही व्यथा थेट देशाच्या पंतप्रधानांकडे (Prime Minister) मांडण्याचे काम बारामतीतील एका चहाविक्रेत्याने (Tea Seller) केले. सामान्यांची ही व्यथा समजून पंतप्रधान काही तरी मदतीचा हात पुढे करतील या अपेक्षेने बारामतीतील अनिल मोरे (Anil More) या चहाविक्रेत्यांनी थेट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावाने शंभर रुपयांची मनीऑर्डर (Moneyorder) त्यांना केली. मनीऑर्डरसोबतच रजिस्टर पत्राद्वारे आपल्या मागण्या त्यांनी पाठविल्या आहेत. (Baramti Tea Seller 100 Rupees Moneyorder Send to Prime Minister)

शहरातील एका रुग्णालयासमोर चहाचा गाडा चालविणा-या अनिल मोरे यांना लॉकडाऊनच्या झळा सहन कराव्या लागल्या. या काळात घर चालविण्याची पंचाईत त्यांच्यापुढे होती. त्या मुळे त्यांनी वैतागून पंतप्रधानांनाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांना केलेली मनीऑर्डर ही दाढी करण्यासाठी पाठवलेली आहे. अनोख्या पध्दतीने त्यांनी सामान्यांच्या व्यथेकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर आरोग्याच्या सोयी, रोजगाराच्या संधी, लसींची संख्या वाढवायला हवी, पंतप्रधान हे देशाचे नेते आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे, पण एकीकडे त्यांची दाढी वाढते आहे तर दुसरीकडे समस्या वाढत आहेत.
कोरोनाने ज्या कुटुंबियानी आपला सदस्य गमावला आहे त्यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत करा, तसेच या पुढील काळात लॉकडाऊन जाहीर केल्यास कुटुंबाला किमान तीस हजारांची मदत करण्याची मागणी अनिल मोरे यांनी केली आहे. कोरोनाने गेल्या दीड वर्षांच्या काळात कमालीचे नुकसान झाले आहे, त्या मुळे सरकारने ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना मदतीचा हात पुढे करावा अशी त्यांची मागणी आहे.
Esakal