नागपूर : मॉन्सूनच्या (Monsoon) प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला मंगळवारी वादळी पावसाने जोरदार दणका (Heavy rains in Nagpur) दिला. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने आलेल्या वादळामुळे अनेक झोपड्या व घरांवरील छप्पर व टिनाची पत्रे उडून गेली. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक चौकांमध्येही वाहतुकीची कोंडी (Traffic jams at intersections) झाली. मृग नक्षत्रातील या पहिल्याच पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. व्हेरायटी चौक, जगनाडे चौक, मेडिकल चौक, अशोक चौक, सिद्धेश्वर हॉलसमोरील मानेवाडा रोड, अयोध्यानगर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता, आशीर्वादनगर, रेशीमबाग मैदानासमोरील रस्त्यासह शहरातील अनेक भागातील लहान मोठया रस्त्यांवर पाणी साचले. (फोटो – प्रतीक बारसागडे) (Trees-fell-horizontally-on-the-roads-due-to-torrential-rains)





Esakal