सातारा : सातारा जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला असून रुग्णसंख्या (corona patient) झपाट्याने कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनचे (lockdown) भूत मानगुटीवर बसले होते. याच काळात हजारोंच्या संख्येने बाधित वाढ झाली. मात्र, तीच बाधित वाढ आता गेल्या तीन-चार दिवसांपासून पूर्णपणे मंदावत चालली असून सोमवारी रात्रीच्या अहवालात फक्त 875 एवढ्या कमी संख्येनं बाधित समोर आले, तर जिल्ह्यात 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे. (Corona Test Positive Of 875 Citizens In Satara District Today)
सातारा जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला असून रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 26 (7932), कराड 194 (23821), खंडाळा 33 (11030), खटाव 210 (17494), कोरेगांव 56 (15327), माण 56 (12044), महाबळेश्वर 1 (4134), पाटण 42 (7442), फलटण 76 (27249), सातारा 133 (37076), वाई 41 (11988) व इतर 7 (1126) असे आजअखेर एकूण 176663 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
Also Read: मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया लवकरच; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची माहिती
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 2 (181), कराड 4 (685), खंडाळा 1 (141), खटाव 4 (434), कोरेगांव 4 (339), माण 1 (233), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (162), फलटण 0 (264), सातारा 6 (1114), वाई 2 (315) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3912 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Also Read: कोरोनाला रोखण्यासाठी 40 हजार लशींचे डोस उपलब्ध करणार : आमदार शिंदे

जिल्ह्यात 1986 नागरिकांना आज डिस्चार्ज
सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1986 नागरिकांना आज घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
-
एकूण नमुने – 873975
-
एकूण बाधित – 176663
-
घरी सोडण्यात आलेले – 159980
-
मृत्यू – 3912
-
उपचारार्थ रुग्ण -12629
Corona Test Positive Of 875 Citizens In Satara District Today
Esakal