सातारा : रक्तदाब (blood pressure) व मधुमेहाचा (diabetes) त्रास असलेल्या नागरिकांना लस (covid19 vaccine) नाकारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव (koregoan) तालुक्यातील उत्तर भागातील अनेक गावांत होत आहे. या परिसरातील सोळशी, नायगाव, करंजखोप, नांदवळ आदी गावांतील सुमारे ८० टक्के नागरिक त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. (health-department-avoid-vaccination-citizens-with-blood-pressure-diabetes-satara-marathi-news)
कोरेगाव उत्तर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित लसीकरण मोहीम राबविली जात आहे. केंद्राच्या वतीने विविध गावांत लशीच्या उपलब्धतेनुसार कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. वास्तविक रक्तदाब, मधुमेह वा अन्य आजार असलेल्या नागरिकांना प्रायोरिटीने लस द्यायला हवी. असे असताना या गावांत मात्र असा त्रास असलेल्या नागरिकांना परत पाठविले जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच हा प्रकार होत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
Also Read: आमदारांनी आवाहन करताच मॅप्रो कोविड रुग्णालयासाठी शिक्षकांची 10 लाखांची मदत
खरे तर गावातच लसीकरण होत असल्याने ही बाब ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीची झाली आहे. मात्र, ही अयोग्य कारणे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या ज्येष्ठांसोबत घरातील एकाने उपस्थित राहणे आवश्यक असल्याने हातातील कामे सोडून कोणी ना कोणी तरी त्यावेळी वेळात वेळ काढून त्याठिकाणी उपस्थित राहात असतो. लस घेण्यापूर्वी येथील लसीकरण केंद्रात ज्येष्ठांच्या रक्तदाबाची किंवा रक्तातील साखरेची तपासणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला साखर असल्याचे कारण सांगत त्यांना लस न देताच परत पाठविण्यात येत आहे. तुम्हाला साखरेचा त्रास आहे, त्यामुळे लस देता येणार नाही, असे स्पष्टपणे त्यांना सांगण्यात येत आहे. खरे तर ही लस पूर्ण सुरक्षित आहे. मधुमेही किंवा अन्य आजारांच्या लोकांना लसीपासून कोणताही धोका नाही, असे सरकारी पातळीवरून ओरडून सांगितले जात असताना हे आरोग्य कर्मचारी मात्र या लशीबाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम करीत आहेत.

Also Read: “कोव्हॅक्सिन’ लस आली रे! दूस-या डाेससाठी नागरिक केंद्रावर
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना नेमकेपणाने काही सांगता आले नाही. संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलून माहिती घेतो, एवढेच त्यांनी सांगितले. अन्य आजारांच्या लोकांना लस प्रायोरिटीने लस देणे गरजेचे असताना; किंबहुना तसा नियमच असताना उत्तर कोरेगावातील या गावांत हा गंभीर प्रकार होत असल्याने यात आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Esakal