अभिनेता पर्ल व्ही. पुरीच्या Peal V Puri case अटकेवरून ट्विटरवर शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर आता टीव्ही अभिनेत्री निया शर्माने Nia Sharma देवोलिना भट्टाचार्जीची Devoleena Bhattarcharjee माफी मागितली आहे. ‘माझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांनी मला खूप प्रेमाने समजावलं की मी चुकले होते. या तिघांच्या मताचा आदर करत, देवोलिना मी तुझी माफी मागते. माझा राग अनावर झाला होता. तू मला माफ करशील अशी आशा आहे’, असं ट्विट नियाने केलं. या माफीनाम्यानंतर देवोलिनानेही नियाला माफ केलं. अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पर्ल पुरीवरून या दोन अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक बाचाबाची झाली होती. (Devoleena Bhattarcharjee Nia Sharma apologise to each other after Twitter fight over Peal V Puri case)
‘माझ्याकडूनही चूक झाल्यास मलाही तू माफ कर. आई, भाऊ आणि रवीला माझ्याकडून धन्यवाद सांग. सुरक्षित राहा आणि काळजी घे’, असं उत्तर देवोलिनाने दिलं. ‘जिथून सुरुवात झाली, तिथेच हे सर्व संपवतेय. पुन्हा एकदा माफी मागते’, असं म्हणत नियाने पुन्हा ट्विट केलं.
Also Read: मराठी मालिकांमध्ये खलनायकी पात्र गाजवणारे कलाकार

Seems like never https://t.co/MT4otVyxsX i said badi badi sehero mein choti choti ladayee hoti rehti hai. ❤️Accept my apologies too. ❤️ https://t.co/v001EoLOZH
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) June 8, 2021
Also Read: ‘फुलाला सुगंध मातीचा’ अडचणीत; मालिका बंद करण्याची होतेय मागणी
नेमकं काय आहे प्रकरण?
पर्लची बाजू घेणाऱ्या नियाने ट्विट करत देवोलिनाची खिल्ली उडवली होती. ‘दीदीला कोणीतरी जाऊन सांगा की आता धरणा आणि कँडल मार्च करू शकत नाही, कारण कोरोना महामारी आहे. त्याचसोबत दीदीला ते विचित्र डान्स रिल्स बनवण्यापूर्वी डान्सचा सराव करण्याची खूप गरज आहे.’ निया शर्माच्या या ट्विटला देवोलिनाने सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘प्लीज छोटीला जाऊन कोणीतरी हे सांगा की फक्त फॅशन स्कील्स दाखवल्याने कोणी चांगला मनुष्य बनत नाही. चांगले विचार आणि चांगलं हृदय असणं गरजेचं असतं, ज्याची कमतरता तिच्यात दिसतेय. मी माझे डान्स रिल्स व्हिडीओ चांगले करते की नाही ते माझ्या चाहत्यांनाच ठरवू दे. इथेसुद्धा परीक्षक होऊन बसली आहे. त्यापेक्षा तू तुझ्या फोटोशूट्सवर लक्ष दे.’
पर्ल पुरीच्या अटकेनंतर नियाने त्याला पाठिंबा देणारं ट्विट करत संबंधित पीडित मुलीवर टीका केली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील एकता कपूर, अनिता हसनंदानी, अली गोनी आणि क्रिस्टल डिसूझा यांसारख्या सेलिब्रिटींनीही पर्लची बाजू घेतली.
Esakal