नवी दिल्ली : सरकारने कोविन पोर्टलसंदर्भात एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आता कोविन पोर्टलचे नवीन अपडेट आले आहे. या अपडेटनंतर आता कोविनवरुन तुम्ही लसीच्या प्रमाणपत्रावर झालेल्या कोणत्याही चुकीला दुरुस्त करु शकाल. जर रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव अथवा जन्मतारीखमध्ये एखादी चूक झाली असेल तर तुम्ही कोविन पोर्टलवर लॉगिन करुन ती चूक सुधारु शकता. कोविन पोर्टलसंदर्भात या नव्या अपडेटची माहिती आरोग्य सेतूच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आलीआहे. प्रमाणपत्रावर झालेल्या एखाद्या चुकीला सुधारण्यासाठी कोविन पोर्टलवर आता Raise an Issue चा पर्याय उपलब्ध असणार आहे. (Now correct personal details like birth date and name on CoWIN vaccine certificate online)

कशा कराल चुका दुरुस्त?

जर आपल्या प्रमाणपत्रावर लिंग, जन्मतारीख, नाव इत्यादींमध्ये काही चुका झाल्या असतील तर आता सरकारने यामध्ये सुधारणा करण्यासाठी सुविधा देऊ केली आहे. प्रमाणपत्रावरील कोणतीही चूक दुरुस्त करण्यासाठी सर्वांत आधी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन कोविन पोर्टलवर लॉगिन करावं लागेल. त्यानंतर त्या आयडीला सिलेक्ट करायला हवं ज्यामध्ये तुम्हाला सुधारणा करायची आहे. त्यानंतर त्या आयडीच्या खाली असणाऱ्या Raise an Issue नावाच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लिंग, जन्म तारीख, नाव अशा बाबी सुधारण्यासाठीचे पर्याय दिसतील.

अनेक देशांच्या आणि राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी लस प्रमाणपत्र असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर जर काही चूक झाली असेल तर त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमच्या ओळखपत्रावरील माहिती आणि लस प्रमाणपत्रावरील माहिती ही एकसारखीच असायला हवी.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here