‘राजा रानीची गं जोडी’ या मराठी मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेक प्रेक्षक ही मालिका रोज न चुकता पाहतात. या मालिकेमधील संजू नावाची प्रमुख भमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.शिवानी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.शूटिंग दरम्यान मिळालेल्या वेळेत शिवानी धमालमस्ती करत असते. यावेळचे फोटो देखील शिवानी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.कधी साडी तर कधी ड्रेस, शिवानी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवानीने लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले होते. साडी, मोत्यांची नथ, त्यावर पारंपरिक दागिने या मराठमोळ्या लूकमध्ये शिवानी खूप सुंदर दिसत आहे.‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेमधील संजू आणि रणजीतच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.शिवानीच्या सोशल मीडियावरील फोटोंवर नेटकरी नेहमी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करतात.