राम चौधरी
वाशीम ः गेली सात दशक गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सात वर्षात ऐतिहासिक पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ आली आहे. वाशीम जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांमधे पहिल्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आता तिसऱ्या स्थानी फेकली गेली. जनाधार असलेले नेतृत्व काँग्रेसच्या बाहेर असल्याने लाटेवर निवडणूक जिंकणारे ‘पाॅलिसी मेकर’ ठरल्याने जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था तोळामासा झाली आहे. पक्षाची राज्याची धुरा नाना पटोले यांच्या हाती आल्यानंतर, तरी काँग्रेस घसरलेल्या नंबराचे आत्मचिंतन करेल का ? असा प्रश्न सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. (Out-of-party leadership with mass support; The Congress was waiting for the ‘high command’ culture)
Also Read: मेहकर कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?

अगदी दोन वर्षापर्यंत जिल्ह्यामधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधे पहिल्या नंबरवर होता. जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हापासून अडीच वर्षाचा कार्यकाळ वगळता जिल्हा परिषदेचा ‘लाल दिवा’ कायम काँग्रेसकडेच राहिला होता. याला कारण होते माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे संघटन कौशल्य. प्रचंड जनाधार असलेल्या अनंतरावांच्या संघटन कौशल्याने पक्षाला सोनियाचे दिन लाभत होते, मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी असलेल्या अनंतरावांना दिल्लीतील काही दरबारी तथाकथीत ‘हायकमांड’च्या इशाऱ्यावर कायम उपेक्षित ठेवल्या गेले.
Also Read: एका मंत्र्याचा अपमान होत असेल, तर कॉँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं- प्रकाश आंबेडकर
प्रत्येक वेळी शब्द देवूनही काँग्रेस नेतृत्वाकडे कागाळ्या करणाऱ्या दरबारींनी अनंतरावांची उपेक्षाच सुरू ठेवली. तरीही अनंतराव देशमुख यांनी पक्षाची धुरा इमाने इतबारे सांभाळत सर्वसामान्य कार्यकर्ता जोडत पक्षाला सत्ताधारी बनविले, मात्र उपेक्षेचा कडेलोट झाल्यानंतर बंडखोरी नैसर्गिक न्याय असतो, त्याप्रमाणे अनंतराव देशमुख यांनी गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढत दिली थोड्या फरकाने अनंतराव पराभूत झाले, तरीही पक्षनेतृत्वाने दखल घेतलीच नाही. परिणामी पक्ष जिल्ह्यात जनाधाराच्या कक्षेबाहेर फेकला गेला. आज जिल्हा परिषदेत अपघाताने अध्यक्षपद असले, तरी इतर स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीच्या पांघरुणात जनाधार शेवटच्या घटका मोजत आहे.
Also Read: भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे “दादा “?

स्वाभिमानाचा ‘पटोले’ पॅटर्न
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आधी भाजपचे खासदार होते, मात्र स्वाभिमान दुखावल्यानंतर पटोलेंनी खासदारकी डावावर लावून भाजपला जय श्रीराम केला होता. तोच स्वाभिमान अनंतरावांनी दाखविला होता, अशा जनाधार असलेल्या अनंतराव देशमुख यांच्यासारख्या नेतृत्वाची दखल नाना पटोले यांनी घेणे गरजेचे आहे. तरच पक्षाला पुन्हा सोनियाचे दिवस येवू शकतात.
Also Read: Buldhana; सिंदखेडराजा उपनगराध्यक्षवर 15 नगरसेवकांचा अविश्वास प्रस्ताव

कॅडरबेस की लिडरबेस
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोशीले वातावरण आहे. अवघ्या काही महिन्यात नाना पटोले यांनी केलेली पक्षबांधणी कॅडरबेसकडे झुकत आहे, मात्र तरीही लाटेवर अथवा जातीय समिकरणावर निवडून येणारे नेते जनाधार असलेल्या नेत्यांसाठी झारीतील ‘शुक्राचार्य’ ठरत आहेत. या लिडरबेसचा बेस कायम ठेवून कॅडरबेस संघटन काँग्रेसची गरज आहे. त्यासाठी अनंतरावांसारखे नेते पक्षात असणे गरजेचे आहे.
संपादन – विवेक मेतकर
Out-of-party leadership with mass support; The Congress was waiting for the ‘high command’ culture
Esakal