म्हसवड (जि. सातारा) : काेविड बाधितांची (covid19 patients) वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने म्हसवड (mashwad) शहरात केवळ मेडिकल (medical shops) व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहर प्रतिबंध क्षेत्र (containment zone) जाहीर केल्याने अन्य दुकानदारांना अथवा व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी नाही. या भागात तातडीने एक जम्बाे काेविड सेंटर (jumbo covid center) उभारले जावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले हाेते. परंतु त्याच्याही हालचाली मंदावल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांना विशेषतः काेविड 19 बाधितांना साता-यास क-हाड येथील रुग्णालयांकडेच जावे लागत आहे. (satara-news-mashwad-jumbo-hospital-for-covid19-patients)

म्हसवड शहरात एकाच कुटुंबातील तब्बल १७ जण कोरोना बाधित आढळून आल्यामुळे येथील प्रतिबंध क्षेत्र पुढील आदेशापर्यंत जैसे थे ठेवण्यात आला आहे. सातारा जिल्हा अनलॉक मात्र म्हसवड येथेच प्रतिबंधित आदेश लागू का केले अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात आली. मंगळवारी म्हसवड पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. येथील नागरिक कोरोनापासून सुरक्षित राहावे असे शासनाचे प्रामाणिकपणे धोरण आहे. म्हसवड अनलॉक केले तर येथील नागरिकांचे आरोग्य आणखी निश्चितपणे धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन येथील कोरोना साथ आटोक्यात आणण्यास प्रत्येकांनी आपले कर्तव्य समजून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन श्री. सुर्यवंशी यांनी केले.

Also Read: Benefits Of Tulsi Leaves: तुळशीचे पाने खाण्याचे हे आहेत फायदे

उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माण तालुक्‍यातील बाधित रुग्ण व मृत्यूची संख्या पाहता खटाव, माणमध्येच जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शासकीय वसतिगृहाच्या सर्व तिन्ही इमारतींची पाहणी करून तेथेच जम्बो कोविड हॉस्पिटल उभारणीबाबत चर्चा करून संबंधितांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. दराडे यांनीही या जागेची पाहणी करून सुविधांबाबत प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना सूचना केल्या.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई, नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर, “आम्ही म्हसवडकर ग्रुप’चे सदस्य युवराज सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी नगराध्यक्ष विजय धट, तहसीलदार बाई माने, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने उपस्थित होते.

Also Read: साताऱ्यातील ‘या’ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं; दोन्ही लाटांत गावं सुरक्षित!

माण व खटाव तालुक्‍यांतील कोरोना साथीच्या पहिल्या व दुसऱ्याही लाटेतील बाधितांची वाढती चिंताजनक संख्या पाहता येथे 150 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल मंजूर करण्यात आले आहे. या भागात 15 दिवसांत हॉस्पिटल रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज ठेवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. परंतु त्या मर्यादित राहिल्याचे सध्याचे चिन्ह आहे.

Collector Shekhar Singh

माण-खटाव हे कायम दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. दुष्काळाप्रमाणे या दोन तालुक्‍याला निधीची व पाण्याची आस कायम होती व आजही आहे. कोरोनाच्या साथीत उपचाराची पुरेशी साधने नाहीत. जम्बो हॉस्पिटलमुळे रुग्णांस उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध होईल.

– प्रभाकर देशमुख, माजी आयुक्त

माण तालुक्‍यात गोंदवले व दहिवडी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. “आम्ही म्हसवडकर ग्रुप”ने कोविड सेंटर सुरू केले आहे. या नजीकच्या इमारतीमध्येच जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू होईल.

– अनिल देसाई, संचालक, जिल्हा बॅंक

ब्लाॅग वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here