गेली 12 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. मालिकेमधील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. ‘तारक मेहता..’ या मालिकेमधील माधवी भिडे नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशीचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमधील सोनालिकाच्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.या मालिकेच्या आधी सोनालिकाने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण तारक मेहता मालिकेमुळे सोनालिकाची लोकप्रियता वाढली. सोनालिकाचा चाहता वर्ग मोठा आहे. तसेच ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालिकाचा मालिकेमधील साधेपणा प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. पण सोशल मीडियावरील तिच्या हटके लूकला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये ती आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी आणि सोनूची आई अशी तिची ओळख आहे. रिअल लाइफ मुलीसोबत सोनालिका जोशी